पाकिस्तानमधील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या पाकिस्तान सुपर लीगला लवकरच सुरुवात होत आहे. मात्र, या नव्या हंगामाआधीच अनेक अडचणींचा सामना आयोजकांना करावा लागत आहे. काही बड्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर, आता या स्पर्धेसाठी निवड झालेले बरेचसे अफगाणिस्तानचे खेळाडू स्पर्धेच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. हे खेळाडू न खेळण्यास त्याचा मोठा परिणाम स्पर्धेच्या प्रेक्षकसंख्येवर होऊ शकतो.
पीएसएलचा पुढील हंगाम 13 फेब्रुवारीपासून सुरू होईल. या हंगामात अफगाणिस्तानचे अनेक खेळाडू खेळताना दिसतील. मात्र, स्पर्धेच्या सुरुवातीच्या काळात अफगाणिस्तान संघ युएई दौरा करेल. त्यामुळे बरेच अनुभवी खेळाडू पीएसएलच्या पहिल्या काही सामन्यांसाठी अनुपस्थितीत असण्याची दाट शक्यता आहे. अफगाणिस्तानचा युएई दौरा 16 फेब्रुवारीपासून सुरू होईल. या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.
मागील काही दिवसांमध्ये अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये बरेच बदल पाहायला मिळाले. मोहम्मद नबी याच्या राजीनाम्यानंतर अनुभवी फिरकीपटू राशीद खान पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल. या मालिकेसाठी संभाव्य 22 खेळाडूंची घोषणा झाली असून, 17 खेळाडूंचा अंतिम संघ त्यानंतर घोषित केला जाईल.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तान आणि यूएईमध्ये झालेल्या करारानुसार ही मालिका 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. गेल्या 5 वर्षातील दोन्ही संघांमधील ही पहिलीच मालिका असेल. यापूर्वी, मार्च 2018 मध्ये वनडे विश्वचषक पात्रता फेरीत अफगाणिस्तान आणि यूएई आमनेसामने आले होते, जिथे अफगाणिस्तानने 5 गडी राखून विजय मिळवला होता. याशिवाय टी20 मध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या शेवटच्या 4 सामन्यांमध्ये प्रत्येक वेळी अफगाणिस्तानचा संघ विजयी ठरला आहे.
(Afghanistan Players Might Miss Pakistan Super League Few Matches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! मिताली पुन्हा ठेवणार मैदानावर पाऊल, महिला आयपीएलमध्ये मिळाली ‘या’ संघाची मोठी जबाबदारी
IND vs NZ 2nd T20: भारत-न्यूझीलंडमध्ये कोण कुणावर भारी? वाचा आमने-सामने रेकॉर्ड काय सांगतो