आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 42वा सामना शुक्रवारी (10 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला जातोय. हा सामना जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळवण्यात येतोय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीला अफगाणिस्तान संघावर वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, त्यानंतर अष्टपैलू अझमत ओमरझाई याने शानदार नाबाद 97 धावा करत संघाला 244 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. अफगाणिस्तान संघासाठी गेराल्ड कोएत्झे याने सर्वाधिक चार बळी मिळवले.
TARGET SET! 🎯@AzmatOmarzay scored an incredible 97* (107) to power #AfghanAtalan to 244/10 in the first inning. @Noor_Ahmad_15 (26) and @RahmatShah_08 (26) were the other batters contributing to the total. 👏
Over to our bowlers now…! 👍#CWC23 | #AFGvSA | #WarzaMaidanGata pic.twitter.com/ksmMht5yxy
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) November 10, 2023
या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या अफगाणिस्तानला रहमानुल्लाह गुरबाज व इब्राहिम झादरान यांनी 41 धावांची चांगली सलामी दिली. मात्र, हे दोघेही याच धावसंख्येवर बाद झाल्याने संघावर दडपण आले. कर्णधार शाहिदी याने देखील केवळ दोन धावा बनवल्या. त्यानंतर रहमत व ओमरजाई यांनी 49 धावांची भागीदारी केली.
प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर ओमरझाई याने आधी राशीत खान व त्यानंतर नूर अहमद यांच्यासोबत भागीदारी केली. राशिदने 14 तर नूर याने 26 धावांची भागीदारी केली. ओमरझाई याने अखेरपर्यंत नाबाद राहत 107 चेंडूंमध्ये नाबाद 97 धावा बनवल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी युवा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झे याने सर्वाधिक चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
(Afghanistan Post 244 Against South Africa Omarzai Shines With 97)