वनडे विश्वचषक 2023 मध्ये 30 वा सामना श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला गेला. पुणे येथील एमसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 7 गडी राखून विजय मिळवला. या स्पर्धेतील तिसऱ्या विजयासह त्यांनी उपांत्य फेरीसाठीच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. या विजयानंतर बोलताना अफगाणिस्तानच्या कर्णधाराने मोठे प्रतिक्रिया दिली.
विश्वचषकातील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी अफगाणिस्तानला या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे होते. त्यांनी योग्य नियोजन करत हा सामना आपल्या नावे केला. त्यानंतर बोलताना अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी म्हणाला,
“हा खरोखरच आनंदाचा क्षण आहे आणि संघाने अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. खेळाच्या तीनही विभागात आम्ही उत्कृष्ट पद्धतीने खेळलो. पाकिस्तानवरील विजयाने आमचा आत्मविश्वास वाढला होता. तीच लय येथे आम्ही कायम राखण्याचा प्रयत्न केला. आमचा सपोर्ट स्टाफ देखील खूप मेहनत घेतोय. या विजयानंतर मी अफगाणिस्तानला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच विजयाबद्दल त्यांचे अभिनंदनही करतो.”
या सामन्याचा विचार केल्यास अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेला प्रथम फलंदाजीची संधी दिली होती. अफगाणिस्तानने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मारा करत श्रीलंकेचा डाव केवळ 241 पर्यंत थांबवला. त्यानंतर अफगाणिस्तानसाठी रहमत शहा, कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी व अझमतुल्लाह ओमरझाई यांनी अर्धशतके ठोकत संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. चार बळी मिळवणारा वेगवान गोलंदाज फझलहक फारूखी पुरस्काराने सन्मानित केले गेले.
(Afghanistan Skipper Speaks After Win Over Srilanka In ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
मैं हू ना! कुलदीपने चाहत्यांना सांगून उडवलेल्या बटलरच्या दांड्या
महाराष्ट्र U19 संघ बनला विनू मंकड ट्रॉफीचा चॅम्पियन! अर्शिन कुलकर्णीचे शानदार शतक, मुंबई पराभूत