आशिया चषक स्पर्धेला बुधवारपासून (30 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी सहा संघांना दोन गटात विभागले गेले असून, ब गटात सहयजमान श्रीलंका, मागील आशिया चषक उपविजेते बांगलादेश व आशियाई क्रिकेटमधील नवी ताकद म्हणून पुढे येत असलेल्या अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. हे तीनही संघ तुल्यबळ असल्याने या गटाला ‘ग्रुप ऑफ डेथ’ म्हटले जातेय. कारण, गटातून केवळ दोनच संघ सुपर फोरसाठी पात्र ठरणार आहेत.
ब गटातील पहिला सामना 31 ऑगस्ट रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या दरम्यान पल्लेकल येथे खेळला जाईल. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे लाहोर येथील गदाफी स्टेडियमवर आमने-सामने येथील. तर गटातील अखेरचा सामना 5 सप्टेंबर रोजी लाहोर येथेच अफगाणिस्तान व श्रीलंका लढतील.
एका चांगल्या संघाला या गटातून साखळी फेरीतच बाहेर पडावे लागेल. अशा स्थितीत कोणते दोन संघ बाजी मारतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आशिया चषकासाठी अफगाणिस्तान संघ:
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झादरान, रियाझ हसन, रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, नजीब झादरान, रशिद खान, इक्रम अली खिल, करीम जनत, गुलबदीन नईब, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी, मोहम्मद अशरफ, नूर अहमद, अब्दुल रहमान आणि सफी सलीम.
आशिया चषकासाठी श्रीलंका संघ:
दसून शनाका (कर्णधार), पाथूम निसांका, दिमूथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, कुसल मेंडिस (उपकर्णधार), चरीथ असलांका, धनंजय डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महीश थिक्षाना, डुनिथ वेललागे, मथीशा पथिराना, कासून राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो और प्रमोद मदुशन.
आशिया चषकासाठी बांगलादेश संघ:
शकीब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, तौहीद ह्रदॉय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन ध्रुबो, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम हसन, शाक मोहम्मद. , नईम शेख , शमीम हुसेन , तन्झीद हसन तमीम , तनज़ीम हसन साकीब , अनामुल हक बिजॉय.
(Afghanistan Srilanka And Bangladesh Sqauds For Asia Cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
हुबळी टायगर्स महाराजा टी20 चॅम्पियन! कॅप्टन मनीष पांडेच्या क्षेत्ररक्षणाने पलटली बाजी
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत किड्स गटात फिंच संघाला विजेतेपद