भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना बेंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळला जात आहे. पण पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात भारताच्या 5 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. पण या खराब कामगिरीमुळे भारताने कसोटी क्रिकेटमध्ये लज्जास्पद रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात भारतीय संघ 46 धावात गार झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर 50 पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला. भारताच्या 91 वर्षांच्या कसोटी इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.
याआधी भारतीय संघाची घरच्या मैदानावर किमान धावसंख्या 75 धावा होती. 1987 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघ 75 धावांवर सर्वबाद झाला होता. भारताने आपला पहिला कसोटी सामना 15 डिसेंबर 1933 रोजी मुंबईत इंग्लंडविरुद्ध खेळला. म्हणजेच भारताने 91 वर्षांपूर्वी पहिली कसोटी खेळली होती. 91 वर्षांच्या कसोटी इतिहासात घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध आता भारताची ही सर्वात कमी धावसंख्या झाली आहे.
न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात भारताचे 5 फलंदाज विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन आपले खातेही उघडू शकले नाहीत.
कसोटी सामन्यांमध्ये घरच्या मैदानावर भारताची सर्वात कमी धावसंख्या-
46– भारत विरुद्ध न्यूझीलंड, बेंगळुरू, 2024
75– भारत विरूद्ध वेस्ट इंडिज, दिल्ली, 1987
76– भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, अहमदाबाद, 2008
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; आगामी हंगामापूर्वीच गांगुलीला मिळाली मोठी जबाबदारी, ‘या’ भूमिकेत दिसणार
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा स्टंपिंग करणारे टाॅप-5 खेळाडू
भारताविरुद्ध 5 विकेट घेऊन इतिहास रचला, न्यूझीलंडच्या गोलंदाजाची अभिमानास्पद कामगिरी