मंगळवारी (२ नोव्हेंबर) अबू धाबीच्या शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर बलाढ्य पाकिस्तान आणि पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळत असलेला नामिबिया संघ आमने सामने होते. पाकिस्तान संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. नामिबिया संघाला पराभूत करत पाकिस्तान संघाने सलग चौथा विजय मिळवला आणि आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात नामिबिया संघातील गोलंदाजाने बाबर आजमला बाद केल्यानंतर असे काही केले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
या सामन्यात पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना १८९ धावा केल्या होत्या. बाबर आजमने या डावात ७० धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिजवानने नाबाद ७९ धावांची खेळी केली. दोघांमध्ये ११३ धावांची भागीदारी झाली होती. ही भागीदारी तोडली ती, नामिबियाचा गोलंदाज फ्राइलिंकने. फ्राइलिंकने टाकलेल्या चेंडूवर बाबर आजमने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि बाबर आजम झेलबाद होऊन माघारी परतला.
परंतु ज्यावेळी तो झेलबाद झाला त्यावेळी गोलंदाज फ्राइलिंक बाबर आजमला डोळा करताना दिसून आला. ही त्याची सेलिब्रेशन करण्याची पद्धत होती की, आणखी काही हे तर माहीत नाही. परंतु फ्राइलिंकने केलेल्या या मजेशीर कृत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
याच सामन्यातील सहाव्या षटकात जेव्हा फ्राइलिंक गोलंदाजीला आला होता. त्यावेळी दुसरा चेंडू टाकल्यानंतर फ्राइलिंकचा तोल गेला होता आणि तो फॉलो थ्रू मध्ये पडला होता. त्यावेळी पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम सर्वात आधी मदत करण्यासाठी आला होता. हा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला.
https://www.instagram.com/reel/CVx0EcRl8d2/?utm_medium=copy_link
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. तर बाबर आजम ७० धावा करत माघारी परतला होता. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाला २ बाद १८९ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना डेविड विसेने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर क्रेग विलियम्सने ४० धावांचे योगदान दिले. हा सामना पाकिस्तान संघाने ४५ धावांनी आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध अफगानिस्तान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
वैराहून माणुसकी जास्त मोठी! नामिबियाविरुद्ध बाबर आझमने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचं होतयं भरपूर कौतुक
सलग चौथ्या विजयासह पाकिस्तानने मिळवले उपांत्य फेरीचे तिकीट, दुसऱ्या स्थानासाठी ‘हे’ २ संघ शर्यतीत