भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपल्या वडिलांच्या निधनानंतर एक दिवसाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हिमांशू पंड्या हे हार्दिक आणि कृणाल पंड्या या दोन क्रिकेटपटूंचे वडील होते. त्यांचे शनिवारी(16 जानेवारी) सकाळी हृदय विकाराने निधन झाले. हिमांशू पंड्या यांचे वयाच्या 71 वर्षी निधन झाले.
जेव्हा त्यांचे निधन झाले, तेव्हा कृणाल पंड्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळत होता. त्याला ही बातमी कळल्यानंतर तो संघाच्या जैव सुरक्षित वातावरणातून बाहेर पडला आणि आपल्या कुटुंबाकडे घरी परतला. तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत बडोदा संघाचे नेतृत्व करत होता.
हार्दिक पंड्याने वडिलांच्या निधनानंतर एक दिवसाने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे, “माझे वडील, माझे हिरो, तुम्हाला गमावले आहे. ही गोष्ट मान्य करणे, जीवनातील सर्वात अवघड गोष्टीपैकी एक आहे. परंतु तुम्ही आमच्यासाठी एवढ्या मोठ्या आठवणी सोडल्या आहेत की, आम्ही फक्त कल्पना करू शकतो की तुम्ही हसत आहात.”
हार्दिक पंड्याने पुढे लिहले, “तुमची मुले ज्या ठिकाणी उभी आहेत, ती तुमची मेहनत आणि आत्मविश्वासामुळे आहेत. तुम्ही नेहमी आनंदी होता. आता या घरात तुमच्या नसण्याने मनोरंजन कमी होणार. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि पुढे ही करत राहू. तुमचे नाव नेहमी टॉपवर राहील. मला एक गोष्ट माहीत आहे, तुम्ही आम्हाला वरुन त्याचप्रकारे बघत आहात. ज्याप्रकारे तुम्ही इथे केले होते. ”
My daddy
As I said to your yesterday
Your last one ride.
Now rest in peace my king
You were a Happy soul!I will miss you everyday dad
Love you always pic.twitter.com/hUipWOdjxL— hardik pandya (@hardikpandya7) January 17, 2021
हार्दिक पुढे म्हणाला,” तुम्हाला आमच्यावर गर्व होता. परंतु डॅडी आपल्या सर्वांना या गोष्टीवर गर्व आहे की, तुम्ही नेहमी स्वत:चे जीवन जगला. जसे की काल म्हणालो होतो आणि पुन्हा एकदा म्हणेल की मी तुम्हाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी मिस करेल. लव यू डॅडी.”
कृणाल आणि हार्दिक पंड्या यांच्या वडिलांचे निधन झाल्याने भारतीय कर्णधार विराट कोहली, इरफान पठाण, आकाश चोप्रा आणि बर्याच आजी-माजी खेळाडूंनी दुःख व्यक्त करताना श्रद्धांजली वाहिली.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडिया २००३ साली ऑस्ट्रेलियात केलेल्या ‘या’ चमत्काराची करणार का पुनरावृत्ती?
Video: वॉशिंग्टन सुंदरने ठोकलेला उत्तुंग षटकार पाहून ‘या’ खेळाडूला झाली युवराजची आठवण
भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघाची ‘ही’ कमजोर बाजू; म्हणूनच मालिका रोमांचक, माजी दिग्गजाने मांडले मत