टी२० क्रिकेट लीगमधील सर्वात मोठी लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीगची ख्याती आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघामध्ये मुंबई इंडियन्सचे नाव अव्वलस्थानी येते. मुंबईने आतापर्यंत आयपीएलचे ५ किताब आपल्या नावावर केले आहेत. ही कामगिरी रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघाने केली आहे. मात्र, आयपीएल २०२२मध्ये या संघाची गाडी रुळावरून खाली उतरताना दिसतेय. आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात मुंबईला सपाटून पराभव स्वीकारावा लागलाय. नुकत्याच झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी ‘पलटण’च्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. यानंतर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला पदार्पणाची संधी देण्याची चर्चा रंगलीय.
मुंबईचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सला कोलकाताविरुद्धच्या एकाच षटकात तब्बल ३५ धावा ठोकल्या गेल्या. विशेष म्हणजे, सॅम्स टाकत असलेल्या डावाच्या १६व्या षटकातच कोलकाताने ५ विकेट्सने विजय मिळवला. यानंतर सोशल मीडियावर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ट्रेंड होऊ लागला. अर्जुनच्या आयपीएल पदार्पणाच्या मागणीने जोर धरला आहे. सॅम्सची निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्या जागी अर्जुनला संधी देण्याची मागणी केली आहे.
अर्जुनदेखील सॅम्सप्रमाणे डाव्या हाताने गोलंदाजी करतो. विशेष म्हणजे, गरज पडेल, तेव्हा तो फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. असे असले, तरी आतापर्यंत मुंबईने त्याला पदार्पणाची संधी दिली नाही. अनेक चाहते असे म्हणत आहेत की, अर्जुनला संघात स्थान देण्याची वेळ आली आहे. एक चाहता चक्क मुंबई संघावर टीका करत म्हणाला की, ‘अर्जुनला सॅम्सच्या जागी संधी द्या. त्याला काय इंटर्नशिपसाठी ठेवलंय का?’
Arjun Tendulkar can play instead of Sams.
Usko kya internship ke liye team me rake ho kya ? @mipaltan ?— Shashank Balnad (@shashank_balnad) April 6, 2022
सोशल मीडियावर अनेक युजर्स अर्जुनच्या पदार्पणाची मागणी करत आहेत. त्यातील काही ट्वीट्स.
https://twitter.com/TweettoAT/status/1511795579328040960?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1511795579328040960%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fafter-mumbai-indians-defeat-against-kkr-fans-demanded-debut-of-arjun-tendulkar-97230
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “ही अर्जुन तेंडुलकरला संघात आणण्याची वेळ आहे.”
https://twitter.com/gillfan_/status/1511787752542523393?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1511787752542523393%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fafter-mumbai-indians-defeat-against-kkr-fans-demanded-debut-of-arjun-tendulkar-97230
#IPL2022 #KKRvMI
3-0 @mipaltan come on. We still can do it. Pace Bowling unit looks rough. Time to try young master. Arjun Tendulkar #arjuntendulkar.— Twitty (@Twittyim) April 6, 2022
अर्जुन तेंडुलकरची देशांतर्गत कामगिरी
अर्जुन तेंडुलकरच्या देशांतर्गत कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत फक्त २ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने फलंदाजी करताना ३ धावा केल्या आहेत, तर गोलंदाजी करताना त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईचा पराभव तर झालाच, पण रोहित शर्माच्या नावावर या नकोशा विक्रमाचीही नोंद, वाचा सविस्तर
MI vs KKR| नितीश राणा अन् जसप्रीत बुमराहला महागात पडली चूक; झाली मोठी कारवाई
IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल