मुंबई। सोमवारी (१९ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १२ वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नईने ४५ धावांनी विजय मिळवत हंगामातील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. चेन्नईच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला तो अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने. त्याने या सामन्यात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही विभागात महत्त्वाचे योगदान दिले. जडेजाच्या योगदानामुळे मात्र, धोनीचे ८ वर्षांपूर्वीचे एक ट्विट प्रचंड व्हायरल झाले आहे.
जडेजाचे ४ झेल
जडेजाने या सामन्यात चेन्नई संघ १८८ धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीला उतरला असताना तब्बल ४ झेल घेतले. त्याने राजस्थानच्या मनन वोहरा, रियान पराग, ख्रिस मॉरिस आणि जयदेव उनाडकट या क्रिकेटपटूंचे झेल घेतले. तो फाफ डू प्लेसिसनंतर एका आयपीएल सामन्यात चेन्नईकडून क्षेत्ररक्षक म्हणून ४ झेल घेणारा दुसराच क्रिकेटपटू ठरला.
धोनीचे ८ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल
धोनीने एप्रिल २०१३ मध्ये जडेजाबद्दल अनेक गमतीशीर ट्विट केले होते. या ट्विट्समध्ये धोनीने जडेजाला ‘सर’ असेही संबोधले होते. तेव्हापासून जडेजाला ‘सर’ हे टोपननावही पडले. त्याच ट्विटच्या सिरिजमधील एक ट्विट धोनीने असे केले होते की ‘सर जडेजा झेल घेण्यासाठी धावत नाही, पण चेंडूत त्याला शोधतो आणि त्याच्या हातात विसावतो.’
Sir jadeja doesn't run to take the catch but the ball finds him and lands on his hand
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) April 9, 2013
धोनीचे हेच ट्विट जडेजाने सोमवारी राजस्थानविरुद्ध ४ झेल घेतल्यानंतर प्रचंड व्हायरल झाले. अनेकांनी या ट्विटवर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या.
https://twitter.com/Aashish10070553/status/1384255245102981122
Once legend said 🔥
Sir @imjadeja what a fielding man🙌#CSK https://t.co/uz1nmrcznl
— Panu🎸🎶 (@Panu23747416) April 19, 2021
https://twitter.com/urstrulykhanf/status/1384232900040675334
We agree 🤷♀️ https://t.co/TAdNSpfH3R
— Wisden India (@WisdenIndia) April 19, 2021
Ms dhoni is never wrong😍 #RRvCSK #CSKvRR #rrvscsk https://t.co/RhWM5161CH
— Vedang 2.0 (@vedkagyaan) April 19, 2021
Perfect day for this tweet ! @imjadeja #CSKvRR #IPL2021 https://t.co/z0QQu0ohfw
— Varun Karwa (@Vrunnnnn) April 19, 2021
जडेजाने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १८७ सामन्यांत ७४ झेल घेतले आहेत.
जडेजा गोलंदाजीतही चमकला
याबरोबर गोलंदाजी करताना त्याने १२ व्या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने ४९ धावांवर खेळणाऱ्या बटलरला त्रिफळाचीत केले. त्यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने दुबेला १७ धावांवर पायचीत केले. या दोन्ही विकेट्स सामन्याला वळण देणाऱ्या ठरल्या. यानंतर राजस्थानला सामन्यात पुनरागमन करता आले नाही. राजस्थान संघाला १८९ धावांचा पाठलाग करताना २० षटकात ९ बाद १४३ धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईने हा सामना ४५ धावांनी सहज जिंकला.
चेन्नईकडून गोलंदाजीत जडेजा व्यतिरिक्त मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच सॅम करनने २ विकेट्स घेतल्या, तर शार्दुल ठाकूरने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅचमास्टर! केवळ जडेजाच नाही तर ‘या’ ६ क्रिकेटपटूंनीही आयपीएलमध्ये एका सामन्यात घेतलेत ४ झेल
पुन्हा एकदा स्टंप्समागून धोनीची कॉमेंट्री, पाहा गमतीदार व्हिडिओ
नाद नाही करायचा! दोन विकेट्स चार झेल घेतल्यानंतर रविंद्र जडेजाचे हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ