---Advertisement---

रोहितप्रमाणे त्याच्या चाहत्यांनीही मनं जिंकली, पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय शतकानंतर पाहा काय केलं

Rohit Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा बऱ्याच दिवसांनंतर आपल्या जुन्या अंदाजात खेळला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरनंतर जिंकला. या विजयानंतर भारताने रोहितच्या नेतृत्वात अफगाणिस्तानविरुद्ध 3-0 असा विजय मिळवला. रोहित शर्मा याच्या पाचव्या टी-20 आंतरराष्ट्रीय शतकाचा आनंद चाहत्यांनी अशा पद्धतीने साजरा केला, ज्यामुळे गरजूंना मदत मिळू शकेल.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही कसोटी मालिका तीन सामन्यांची होती. ही मालिका खेळण्यासाठी भारतात आलेल्या अफगाणिस्तान संघाला एकही विजय मिळवता आला नाही. असे असले तरी, तिसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानकडून भारतीय संघाल कडवे आव्हान मिळाले. भारतीय संघाला विजयासाठी दोन एक नाही तरदोन सुपर ओव्हर खेळाव्या लागल्या. रोहित शर्मा याने या सामन्यात 69 चेंडूत 121 धावांची वादळी खेळी केली. या शतकानंतर रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच शतके करणारा एकमेव फलंदाज देखील ठरला.

रोहितला मागच्या मोठ्या काळानंतर अशी अप्रतिम खेळी करता आली. या खेळीचा आनंद चाहत्यांमध्येही पाहायला मिळाला. त्याच्या काही चाहत्यांनी या शतकाच्या आनंदात गरजूंना अन्नदान केल्याचे समोर येत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहितचा फोटो लावलेले काही पार्सल्स समोर आले आहेत. चाहत्यांनी रोहितच्या शतकाचा आनंद ज्या पद्धतीने साजरा केला, त्याचे सर्वत्र कौतुक देखील होताना दिसते.

दरम्यान, उभय संघांतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्याचा विचार केला, तर हा सामना दोन वेळा टाय झाला. 40 षटकांच्या खेळानंतर दोन्हीपैकी एक संघ जिंकणे अपेक्षित होते. पण दोन्ही संघांनी निर्धारित 20 षटकांमध्ये प्रत्येकी 212-212 धावा केल्या. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये एक संघ जिंकेल, असा सर्वांचा अंदाज होता. पण सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी प्रत्येकी 16-16 धावा केल्या आणि पुन्हा एखदा सामना टाय झाला. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र भारताने प्रथम फलंदाजी करताना 11 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ अवघी एक धाव करू शकाला आणि पराभव स्वीकारला. (After Rohit Sharma’s century, his fans also won everyone’s hearts, look what he did)

महत्वाच्या बातम्या – 
IND vs AFG । दुसरी सुपर ओव्हर टाय झाली असती तर? वाचा काय सांगतो आयसीसी नवीन नियम
‘तुम्हाला धैर्याने खेळायला शिकवू शकत नाही…’, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर सिकंदर रझा संतापला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---