विश्वचषकात शिखर धवन पार पाडू शकतो प्रमुख भूमिका, आकडेवारी वाचून कळेल महत्व

यावर्षी आयसीसी वनडे विश्वचषकाचे आयोजन भारतात केले जाणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात हा विश्वचषक खेळला जाणार आहे. पण यासाठी अद्याप भारतीय संघ पूर्णपणे तयार झाल्याचे दिसत नाही. संघातील प्रमुख खेलाडू दुखापतीमुळे मोठ्या काळापासून मैदानात दिसले नाहीत. अशात शिखर धवन विश्वचषकात पुन्हा एकदा भारतासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. धवन आपल्या आकडेवारीच्या जोरावर या संघात स्थान बनवू शकतो.
आयसीसी वनडे विश्वचषकात (ODI WC 2023) शिखर धवन (Shikhar Dhawan) भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत पहिला क्रमांक विराट कोहली याचा आहे. तसेच दुसरा क्रमांकावर रोहित शर्मा आहे. विराटने वनडे विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत 1559 धावा केल्या आहेत, तर रोहितच्या नावावर 1459 धावांची नोंद आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शिखर धवन याने वनडे विश्वचषक स्पर्धेत 1238 धावा केल्या आहेत. अशात यावर्षीच्या वनडे विश्वचषकात देकील संघ व्यवस्थापन त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवू शकते.
धवनची आखडेवीर जबरदस्त असली, तरी मागच्या काही वर्षांमध्ये त्याला खूपच कमी सामन्यांसाठी निवडले गेले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर असल्यानंतर किंवा दुसऱ्या मालिकेत खेळत असताना धवनला संधी दिली गेली आहे. मागच्या दोन-तीन वर्षांमध्ये धनव भारताच्या युवा संघाचे नेतृत्व करताना अनेकदा दिसला आहे. पण आगामी आशियाई गेम्समध्ये त्याची जागा ऋतुराज गायकवाड (Rituraj Gaikwad) याने घेतल्याचे दिसते. अशात निवडकर्ते आणि संघ व्यवस्थान यांनी धवनकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसते, हेदेखील लक्षात घेण्यासारखे आहे. असे असले तरी, सध्या संघाला अनुभवी खेळाडूंची गरज आहे, जे विश्वचषक आणि त्यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करू शकतील. अशात शिखर धवन याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत येत आहे.
37 वर्षीय धवनने भारतासाठी एकूण 167 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने 17 शतक आणि 39 अर्धशतकांच्या मदतीने 6793 धावा आहेत. या धावा त्याने 44.11ची सरासरी आणि 91.35च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. (After seeing Shikhar Dhanav’s statistics, his importance in ODI World Cup is understood)
महत्वाच्या बातम्या –
‘या’ दोघांनी वाढवली रोहित शर्माची चिंता! वनडे विश्वचषकात पार पाडणार होते महत्वाचा भूमिका
‘या’ भारतीयाने स्विंगच्या जोरावर 15 वर्ष दिला त्रास, ऍरॉन फिंचने स्वतः केले मान्य