ईशान किशन आणि हॅरिस रौफ यांच्यातील घमासान शनिवारी (2 सप्टेंबर) खेळला गेला. भारत आणि पाकिस्तान आशिया चषक 2023 मध्ये पहिल्यांदाच आमने सामने आले होते. ईशान किशसने भारतीय संघ अडचणीत असताना 82 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यष्टीरक्षक फलंदाज शतक करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याने त्याला झेलबाद केले. ईशानने विकेट गमावल्यानंतर हॅरिसने त्याला मैदानातून बाहेर जाण्याचा थेट इशारा देखील केला.
हॅरिस रौफ भारताविरुद्धच्या या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. ईशान किशन याच्या रुपात त्याने सामन्यातील तिसरी विकेट घेतली. भारतीय संघासाठी सामन्यातील हा पाचवा झटका होता. यष्टीरक्षक फलंदाज 81 चेंडूत 82 धावा करून बाबर आझम याच्या हातात झेलबाद झाला. भारताच्या डावातील 38वे षटक टाकण्यासाठी हॅरिस रौफ आला होता. षटकातील तिसऱ्या चेंडूवर ईशानने विकेट गमावली. विकेट मिळाल्यानंतर हॅरिस रौफ खूपच आक्रमक झाल्याचे दिसले. त्याने ईशान किशनला खेळपट्टी सोडून थेट ड्रेसिंग रुममध्ये जाण्याचा ईशाराच केला. पाकिस्तानी गोलंदाजाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
patwari brother Haris brings us back in the game. ISHAN KISHAN GONE. #PAKvIND pic.twitter.com/UibUH73i5i
— Dexie (@dexiewrites) September 2, 2023
Haris Rauf celebrates Ishan Kishan's wicket with an aggressive send off 👀
Next over, Hardik Pandya smashed Rauf for three boundaries. 🏏💥#hardik #IshanKishan #I pic.twitter.com/ZtbTNcioUA
— Md Nayab (@MdNayab175862) September 2, 2023
दरम्यान, सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने पहिल्या चार विकेट्स संघाची धावसंख्या अवघी 66 असताना गमावल्या. पण वाचव्या विकेटसाठी ईशान आणि हार्दिक पंड्याने 138 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या खेळीमुळेच संघ समाधानकार धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (11), शुबमन गिल (10), विराट कोहली (4) आणि श्रेयस अय्यर (14) यांपैकी एकही फलंदाज 20 धावांचा टप्पा पार करू शकला नाही. (After taking the wicket of Ishan Kishan, Harris Rauf warned the Indian batsman to leave the field)
भारत प्लेईंग इलेव्हन– रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज
पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन- फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
महत्वाच्या बातम्या –
फॉर्म खरंच गेलाय! मागील 18 वनडेत गिलची बॅट थंडावलेलीच, धक्कादायक आकडेवारी समोर
वनडे आशिया चषकात 2014 पासून विराटची बॅट शांतच, समोर आले चाहत्यांची चिंता वाढवणारे आकडे