सोमवारी (१२ एप्रिल) आयपीएलच्या चाहत्यांना पैसा वसूल सामना पहायला मिळाला. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडलेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील पहिल्या डावात, आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला बाद केल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा गोलंदाज रियान परागने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
युवा संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वानखेडे स्टेडियमवर सामना असल्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणे अपेक्षित होते आणि तसे झाले सुध्दा. पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुलने तुफानी ९१ धावांची खेळी केली तर ख्रिस गेलने सुद्धा ४० धावांचे योगदान दिले होते.
गेल आणि राहुल या दोघांनी मिळून राजस्थान रॉयल्स संघाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला होता. पंजाब संघाने ९ षटकात ८९ धावा केल्या होत्या. त्यानंतर संजू सॅमसनने गोलंदाजीसाठी रियान परागला बोलावले. १० व्या षटकातील रियान परागच्या पाचव्या चेंडूवर गेलने षटकार मारण्यासाठी चेंडू लाँग ऑनच्या दिशेने टोलवला. तो चेंडू लाँग ऑनला उभा असलेल्या बेन स्टोक्सने टिपला.
हा मोठा फलंदाज बाद केल्यानंतर परागने जल्लोष साजरा करताना बिहू डान्स केला होता. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1381628346858016772?s=20
रियान परागला या सामन्यात एकच षटक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्या षटकात त्याने ७ धावा देत ख्रिस गेलला बाद केले. यासोबतच त्याने दुसऱ्या डावात २२२ धावांचा पाठलाग करताना ११ चेंडूत २५ धावांची खेळी केली. यात त्याने ३ षटकार लगावले आणि १ चौकार लगावला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने ४ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
अंतिम षटकात संजू सॅमसनची ‘ती’ चूक भोवली, पंजाबची अवघ्या ४ धावांनी राजस्थानवर मात