भारतीय संघाने कानपूर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांग्लादेशचा 7 विकेट्सने पराभव करत दोन सामन्यांची मालिका जिंकली आहे. या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 2-0 ने बांग्लादेशला क्लीन स्वीप केला आहे. बांग्लादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने मोठा विक्रम केला आहे. असे करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांच्या नावावरही हा महान विक्रम कधीच नोंदवला गेला नाही. जो भारतीय संघाने कानपूरमध्ये आपल्या नावावर केला आहे.
भारताचा हा मायदेशातला सलग 18 वा कसोटी मालिका विजय आहे. दुसऱ्या कसोटीत आर. अश्विन, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी दमदार कामगिरी केली आहे. तसेच या सामन्यात बांग्लादेश पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 285 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने बांग्लादेशला 146 धावात गुंडाळले. विजयासाठी 95 धावांचे आव्हान मिळाल्यावर हे आव्हान 7 विकेट्सच्या मोबदल्यात पार करत सामना आणि मालिका भारतीय संघाने खिशात घातली आहे.
भारताने नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने मायदेशात आतापर्यंत एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. त्यामुळे मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ अव्वलस्थानी आहे. यामुळे भारतीय कसोटी संघासाठी संपूर्ण भारत हा बालेकिल्ला बनला आहे. तसेच कोणत्याही देशास टीम इंडियाला भारतामध्ये हरवणे इतके सोप्पे नाही.
भारतीय संघाने आत्तापर्यत जिंकलेल्या 18 कसोटी मालिका पुढीलप्रमाणे :-
1. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 4-0 ने जिंकली (4) (2013)
2. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 (2) (2013) जिंकली
3. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (4) (2015)
4. न्यूझीलंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (3) (2016)
5. इंग्लंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 4-0 ने जिंकली (5) (2016)
6. बांगलादेश विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 (1) (2017) जिंकली
7. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-1 (4) (2017) जिंकली
8. श्रीलंका विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (3) (2017)
9. अफगाणिस्तान विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (1) (2018)
10. वेस्ट इंडिज विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 (2) (2018) जिंकली
11. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 3-0 ने जिंकली (3) (2019)
12. बांगलादेश विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 ने जिंकली (2) (2019)
13. इंग्लंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 3-1 (4) (2021) ने जिंकली
14. न्यूझीलंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली (2) (2021)
15. श्रीलंका विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 (2) (2022) जिंकली
16. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 2-1 (4) (2023) ने जिंकली
17. इंग्लंड विरुद्ध भारत – भारतीय संघाने कसोटी मालिका 4-1 (5) (2024) ने जिंकली
18. भारत विरुद्ध बांग्लादेश- भारतीय संघाने कसोटी मालिका 2-0 (2) (2024) ने जिंकली
हेही वाचा-
खतरनाक..! टीम इंडियाचा दणदणीत विजय, बांग्लादेशच्या चारीमुंड्या चीत..! मालिका 2-0 ने खिश्यात
जे इंग्लंड-ऑस्ट्रेलियाला नाही जमलं ते भारतानं करुन दाखवलं, 21व्या शतकात अशी कामगिरी करणारा पहिला देश
दुसऱ्या डावात बांग्लादेश ढेपाळला, भारत ऐतिहासिक कसोटी विजयाच्या उंबरठ्यावर