भारतात शिक्षण शुल्क आर्थिक क्षेत्राशी संबंधित फायनान्सपियर या कंपनीने भारतीय संघाचा क्रिकेटपटू रोहित शर्माची ब्रँड एंबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. रोहित शिक्षण क्षेत्रात बदल आणि नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यास मदत करेल. यामुळे भारतीय पालक आणि शाळांमध्ये फायनान्सपियरची पोहोच वाढविण्यातदेखील मदत होईल.
रोहित म्हणाला, “फायनान्सपियरशी संबंध असल्याचा मला आनंद आहे. त्याच्याकडे असलेले सर्वात महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शिक्षणाचे एक मनोरंजक व्यवसाय मॉडेल. एक वडील म्हणून मुलाचे भविष्य किती महत्त्वाचे आहे हे मला माहीत आहे आणि फायनान्सपियर यात मदत करीत असल्याचा मला आनंद आहे.”
रोहित शर्माची लोकप्रियता पाहता प्रत्येक कंपनी त्याच्या सोबत जाऊ इच्छित आहे. हिटमॅनने नुकतेच मुंबई इंडियन्स संघाला आपल्या नेतृत्त्वाखाली पाचवे आयपीएल विजेतेपद जिंकून दिले आहे. तो स्वत: 6 वेळा या स्पर्धेचा चॅम्पियन बनला आहे. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सचा खेळाडू म्हणून त्याने आयपीएलचे जेतेपद जिंकले होते, तर मुंबईचा कर्णधार म्हणून 2013, 2015, 2017, 2019 व 2020 मध्ये त्याने जेतेपद पटकावून दिले आहे.
ऑस्ट्रेलिया दौर्यावर रोहित शर्माचा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. तथापि, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान तो भारतीय संघाचा भाग नसेल.
यादरम्यान पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे. तो आपल्या पहिल्या अपत्यासाठी भारतात परतणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल २०२१ साठी केव्हा होणार लिलाव? बीसीसीआयने दिली फ्रेंचायजीना माहिती
-राहुल द्रविडने सांगितले, मुंबई इंडियन्सच्या यशामागील ‘हे’ आहे खरे कारण
-“धोनी आयपीएल २०२१ ला चेन्नईचे कर्णधारपद सोडेल”, या दिग्गजाचे मोठे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
-ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
-सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
-भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर