भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठी तयारी करत आहे. आशिया चषकाची सुरुवात 30 ऑगस्ट, तर वनडे विश्वचषक 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. विश्वचषकत रोहितच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजेतेपदासाठी दावेदार मानला जात आहे. पण कर्णधार रोहित शर्मा याचे वैयक्तिक प्रदर्शन महत्वाचे ठरणार, यात शंका नाही. याच पार्श्वभूमीवर रोहित आपल्यातील जुना फॉर्म शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
रोहित शर्मा मागच्या वनडे विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्याने भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून 648 धावा कुटल्या होत्या आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील ठरला होता. आगामी वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर देखील रोहित शर्मा आपला हाच जुना फॉर्म पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. 2019 वनडे विश्वचषकापूर्वी तो चांगल्या शेप आणि मानसिकेत होता. माध्यामांना दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत रोहित याविषयी म्हणाला, “माझ्यासाठी शांत राहणे महत्वाचे आहे. बाहेर सुरू असलेल्या गोष्टीमुळे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत असताता. पण मला या सर्वांची चिंता करायची नाहीये. मला 2019 विश्वचषकापूर्वी मी ज्या फेजमध्ये होते, ती फेज पुन्हा मिळवायची आहे.”
रोहित शर्मा पुढे असेही म्हणाला की, “त्यावेली माझी मानसिकता चांगली होती आणि स्पर्धेसाठी खरोखर चांगली तयारी केली होती. मला तो फॉर्म पुन्हा मिळवायचा आहे आणि त्यासाठी माझ्याकडे वेळ देखील आहे. याचा मी शोध घेत आहे की, 2019 विश्वचषकापूर्वी मी कोणत्या गोष्टी करत होतो, ज्यामुळे मला फायदा मिळत होता. एक क्रिकेटपटू आणि मानूस या गोष्टी महत्वाच्या आहेत. मी माझ्या त्या विचार करण्याच्या पद्धतीला पुन्हा भेट द्यायची आहे.”
दरम्यान, आगामी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे आहे. मात्र मालिकेतील 13 पैकी फक्त चार सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जात आहेत. राहिलेले 9 सामने भारतीय संघामुळे श्रीलंकेत आयोजित केले गेले. म्हणजेच ही स्पर्धी हायब्रिड मॉडेलवर आयोजित केली गेली आहे. भारतीय संघ सुरक्षेच्या कारणास्तव आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये जाण्यात तयार नव्हता. 30 ऑगस्ट रोजी आशिया चषकाचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात खेळला जाणार आहे. भारताला आपला पहिला सामना 2 सप्टेंबंर रोजी पाकिस्तानसोबत खेळायचा आहे. (Ahead of the ODI World Cup 2023, Rohit Sharma gave a special comment about his form)
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023 साठी जसप्रीत बुमराह तयार, नव्या हेअरस्टाईलची सर्वत्र चर्चा
Virat Kohli । आशिया चषकात न्यू लूकमध्ये दिसणार किंग कोहली, फोटो सोशल मीडियावर व्हायरल