भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गज एलन बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलियासाठी स्वतःची प्लेइंग इलेव्हन निवडली. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजयासाठी ऑस्ट्रेलियन संघ सर्व प्रयत्न करेल. पण एलन बॉर्डर यांनी दुसऱ्या कसोटीसाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियन संघात त्यांचा मॅच विनर खेळाडूच नाहीये.
पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघा दारून पराभूत झाला. पण फिरकीपटू टॉड मर्फी (Todd Murphy) याने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. मर्फीने या सामन्यातून ऑस्ट्रेलियासाठी कसोटी पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात सात विकेट्स घेतल्या. मात्र, संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. भारतीय संघाने हा सामना जिंकल्यानंतर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारी पासून दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
दुसऱ्या कसोटीपूर्वी दिग्गज एलन बॉर्डर (Allan Border) म्हणाले की, “तुम्ही नाथन लायनला संघात स्थान दिले पाहिजे. त्याने संघात प्रथम जागा मिळवण्यासाठी उरेसे ब्राउनी पॉइंट मिळवले आहेत. युवा टॉड मर्फीचे अभिनंदन त्याला संघातून बाहेर ठेवणे कठीण असेल. मला माहिती आहे की, खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असेल. मला वाटते संघाच्या यशाचा मार्ग तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज असा आहे.”
एलन बॉर्डर यांनी दुसऱ्या कसोटीसाठी निवडलेली प्लेइंग इलेव्हन –
डेविड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मारनस लाबुशेन, स्टीव स्मिथ, पीटर हॅड्सकॉम्ब, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, नाथन लायन, जोस हेजलवुड
दरम्यान, भारतीय संघासाठी दिल्ली कसोटीतील विजय महत्वाचा असेल. कारण संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला मात द्यावी लागेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाचे अंतिम सामन्यातील स्थान जवळपास पक्के मानले जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना 7 ते 11 जूनदमर्यान लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. (Ahead of the second Test, Alan Border himself selected the playing XI, with the match-winners out of the squad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग । सेल्फी मागणाऱ्या चाहत्याला खटकले पृथ्वी शॉचे वागणे! गाडीवर केली दगडफेक
बुमराहपाठोपाठ टीम इंडियाचा आणखी एक गोलंदाज हॉस्पिटलमध्ये! सहा महिने क्रिकेटपासून राहणार दूर