सध्या भारत विरूद्ध ऑस्टेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा कसोटी सामना (6 ते 10 डिसेंबर) दरम्यान ॲडेलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅन्टिंगने उर्वरित 4 सामन्यात आपल्या खेळाडूंना फॉर्ममध्ये परतण्यासाठी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीप्रमाणेच आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मार्नस लाबुशेन भारतीय वेगवान गोलंदाजांविरूद्ध संघर्ष करताना दिसला. या सामन्यात त्याने 2 आणि 3 धावा केल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 295 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. स्टीव्ह स्मिथला पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराजविरूद्धही संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार फलंदाजाने पहिल्या सामन्यात केवळ 17 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाॅन्टिंग (Ricky Ponting) आयसीसीच्या रिव्ह्यूमध्ये म्हणाला, “पर्थमधील सर्व फलंदाजांपैकी मार्नसला सर्वात जास्त संघर्ष करताना पाहिले. हे खरे आहे की, विकेट कठीण होती आणि भारतीय गोलंदाज चमकदार गोलंदाजी करत होते, परंतु त्यांना बदलण्यासाठी मार्ग शोधावा लागेल.”
या संदर्भात पाॅन्टिगने दिग्गज फलंदाज विराट कोहलीचे (Virat Kohli) उदाहरण दिले, जो पहिल्या डावात 5 धावा करून बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात नाबाद 100 धावा करून पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. पाॅन्टिंग म्हणाला, “विराटचा त्याच्या खेळावर विश्वास होता. तो पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात वेगळ्या खेळाडूसारखा दिसत होता. विरोधी संघाशी लढण्याऐवजी त्याने आपल्या मजबूत मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले. मार्नस आणि स्मिथ यांना तेच करण्याची गरज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारतापुढे झुकला पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्राॅफीच्या हायब्रीड माॅडेलसाठी तयार
IND vs PAK; राजस्थानने खरेदी केलेला 13 वर्षीय खेळाडू पाकिस्तानपुढे ठरला फेल
WTC Points Table; श्रीलंकेविरूद्धच्या विजयानंतर आफ्रिकेला बंपर फायदा, तर भारताचे वर्चस्व कायम