क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये प्ले-ऑफसच्या दुसऱ्या दिवशी क्वालीफायर 3 व 4 आणि एलिमीनेटर 3 व 4 हे सामने झाले. अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने क्वालीफायर 3 मध्ये नांदेड चांबल चॅलेंजर्स संघाला नमवत तर कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने क्वालीफायर 4 मध्ये मुंबई शहर मौर्य मेवरीक्स संघाला नमवत या संघांनी सेमी फायनल मध्ये प्रवेश केला. एलिमीनेटर 3 व 4 मध्ये पालघर व मुंबई उपनगर संघ पराभूत झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
आज झालेल्या क्वालीफायर 3 च्या सामन्यात अहमदनगर पेरियार पँथर्स संघाने 40-27 असा नांदेड चांबल चॅलेंजर्स संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यांतराला 16-14 अशी 2 गुणांची नाममात्र आघाडी अहमदनगर संघाकडे होती. पहिल्या हाप मध्ये नांदेड संघाच्या अभिषेक बोरुडे व सुराज पाटील यांनी जबरदस्त बचाव करत अहमदनगर संघाला चांगला प्रतिकार दिला मात्र मध्यांतरा नंतर मात्र अहमदनगर च्या आदित्य शिंदे व प्रफुल झवारे यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला विजय मिळवून दिला. तर क्वालीफायर 4 मध्ये कोल्हापूर ताडोबा टायगर्स संघाने 40-24 असा एकतर्फी मुंबई शहर संघाचा पराभव केला. कोल्हापूर संघाकडून संपूर्ण सामन्यात सांघिक खेळ बघायला मिळाला तर मुंबई शहर कडून शार्दूल पाटीलने एकाकी झुंज दिली. कोल्हापूर कडून तेजस पाटील, ओमकार युवराज पाटील व दादासो पुजारी यांनी उत्कृष्ट खेळ केला.
एलिमीनेटर 3 च्या सामन्यात ठाणे हम्पी हिरोज संघाने पालघर काझीरंगा रहिनोस संघाला 39-25 असे नमवत सेमी फायनल क्वालीफायर 1 साठी जागा मिळवली. ठाणे संघाकडून विघ्नेश चौधरी व मंगेश सोनावणे यांनी महत्वपूर्ण खेळी केली. तर पकडीत यश भोईर ने 4 तर प्रथमेश बालेकुंदरी ने 3 गुण मिळवले. चौथ्या एलिमीनेटर मध्ये नाशिक द्वारका डिफेंडर्स संघाने 47-20 असा मुंबई उपनगर मुर्थाल मॅग्नेट्स संघावर विजय मिळवला. नाशिक संघाकडून आकाश ने 13 गुण मिळवले. तर शिवकुमार बोरगोडे ने चढाईत 5 तर पकडीत 4 गुण मिळवत अष्टपैलू खेळ केला. ओंकार पोकळे ने 5 पकडी करत महत्वपूर्ण भूमिका निभावली. मुंबई उपनगर संघाकडून शुभम दिडवाघ ने 9 गुण मिळवले. (Ahmednagar Periyar Panthers, Kolhapur Tadoba Tigers enter semi finals)
उद्या होणारे सामने –
सेमी फायनल क्वालीफायर 1 – नांदेड चांबल चॅलेंजर्स विरुद्ध ठाणे हम्पी हिरोज
सेमी फायनल क्वालीफायर 2 – मुंबई शहर मौर्य मेवरीक्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स
सेमी फायनल 1 – अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध सेमी फायनल क्वालीफायर 1 विजयी संघ.
सेमी फायनल 2 – कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध सेमी फायनल क्वालीफायर 2 विजयी संघ.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एलिमीनेटर 3 – ठाणे हम्पी हिरोज संघाची पालघर संघावर मात, पालघर संघाचे आव्हान संपुष्टात
एलिमीनेटर 4 – नाशिक द्वारका डिफेंडर्स संघाची मुंबई उपनगर संघावर मात