---Advertisement---

स्पोर्ट्स मॅनियाचा डिसोझा एफएकडून पराभव

---Advertisement---

पुणे, २५ मार्च: एआयएफएफ सब ज्युनियर २०२४-२५ लीगच्या ब गटामध्ये मुंबईतील कूपरेज येथे सोमवारी झालेल्या सामन्यात स्पोर्ट्स मॅनियाला डिसोझा एफएकडून १-२ असा निसटत्या पराभवाचा धक्का बसला.

विजयी संघाकडून प्रत्येक हाफमध्ये एक गोल झाला. दोन्ही गोल कृष्ण शेट्टीने केले. 

सोमवारच्या पराभवामुळे स्पोर्ट्स मॅनियाला एकही गुण मिळाला नाही. लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांनंतर त्यांच्या नावे ११ गुण आहेत.

पुणे येथील स्पोर्ट्स मॅनियाचा त्यांच्या ‘अवे’ मोहिमेतील (५ गुण, ४ सामने) हा पहिला पराभव आहे. चार ‘अवे’ सामन्यांमध्ये १ विजय, १ पराभव आणि २ अनिर्णित निकालाचा समावेश आहे.

दरम्यान, स्पोर्ट्स मॅनिया संघाचा त्यांच्या घरच्या मैदानावर (होम’ ग्राउंड) खेळलेल्या 3 सामन्यांमध्ये दोन विजय (6 गुण) मिळवले असून एकदा पराभव झाला आहे.

सोमवारी, दुपारी झालेल्या सामन्यात, पहिल्या सत्रात कृष्ण शेट्टीने (35+2′) डिसोझा एफए संघाचे खाते उघडले.

मध्यंतरानंतर, कृष्ण शेट्टीने (67′) वैयक्तिक दुसरा गोल करताना डिसोझा एफए संघाची 2-0 अशी आघाडी वाढवली. 

दुसऱ्या हाफमध्ये बदली खेळाडू अरमान दवेने केलेल्या गोलमुळे स्पोर्ट्स मॅनिया संघासाठी गोल केला. दुसऱ्या सत्रात अरमान हा आर. कार्तिकेयच्या जागी आला होता.

यापूर्वी ‘होम’ मैदानावर स्पोर्ट्स मॅनिया संघाने डिसोझा एफए संघाला 3-2 असे हरवले होते.

स्पोर्ट्स मॅनिया संघ एआयएफएफ सब-ज्युनियर लीगमध्ये 27 मार्च रोजी ‘होम’ सामन्यात महाराष्ट्र ओरांजे एफसी संघाविरुद्ध खेळेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---