बांगलादेश क्रिकेटमध्ये (Bangladesh cricket) ५ जानेवारी २०२१ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. याच दिवशी बांगलादेश संघाने न्यूझीलंड संघाला त्यांच्याच देशात जाऊन पराभूत करण्याचा कारनामा केला आहे. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. गेल्या १० वर्षात असा कारनामा करणारा बांगलादेश संघ आशियातील एकमेव संघ ठरला आहे. या सामन्याचा हिरो ठरला तो बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन (Ebadot Hossain). त्याच्याबद्दल काही खास गोष्टी आहेत, ज्या अनेकांना माहीत नसतील.
इबादत हुसेनच्या कसोटी (Ebadot Hossain stats) कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत खास अशी काही कामगिरी केली नव्हती. परंतु, न्यूझीलंड संघाविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने या सामन्यात एकूण ७ गडी बाद केले. (Newzealand vs Bangladesh)
इबादत हुसेनचा बांगलादेश संघात प्रवेश करण्याचा प्रवास खूप वेगळा आहे, परंतु खूप खास देखील आहे. क्रिकेट कारकीर्द सुरू करण्यापूर्वी तो एअर फोर्ससाठी व्हॉलीबॉल खेळायचा. त्याने देखील ब्रेट लीसारखे वेगवान गोलंदाज होण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण झाले, ते २०१६ मध्ये. ज्यावेळी त्याने फरिदपुरमध्ये वेगवान गोलदाजांसाठी झालेल्या टॅलेन्ट हंटमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी तो या इव्हेंटमध्ये टॉप ३ गोलंदाजांमध्ये होता. (volleyball player became Cricketer)
अधिक वाचा – बांगलादेशचे न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजयासह मोठे विक्रम! विश्वविजेत्या ‘किवीं’ना मायभूमीत पराभवाचा धक्का
त्याने २०१९ मध्ये बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याची बांगलादेश संघात निवड झाली होती. त्याने २०१९ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण केले होते.
तसेच गडी बाद केल्यानंतर त्याने आपल्या सॅल्युट करण्याच्या सेलिब्रेशनबद्दल म्हटले की, “मी बांगलादेश वायू सेनेतील जवान आहे. त्यामुळे मला माहित आहे की, सॅल्युट कसा करायचा. व्हॉलीबॉलपासून ते क्रिकेटपटू होण्याचा प्रवास खूप मोठा आहे. मी सध्या बांगलादेश आणि वायू सेनेचे प्रतिनिधित्व करताना आपल्या खेळाचा आनंद घेत आहे.”
महत्वाच्या बातम्या :
पहिल्या वनडेला एक्कावन्न वर्षे पूर्ण! वाचा ‘त्या’ ऐतिहासिक सामन्याबाबत काही रंजक गोष्टी
वाढदिवस विशेष : परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार
हे नक्की पाहा :