मुंबई- महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने १५ जुलै हा कबड्डी महर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिवस “कबड्डी दिन” म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने किशोर, कुमार व खुलागट राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघातून खेळताना विशेष प्राविण्य दाखविनाऱ्या महाराष्ट्राच्या उत्कृष्ट खेळाडूंचा शिष्यवृत्ती, पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
कबड्डी क्षेत्रातील जेष्ठ कार्यकर्ता, जेष्ठ पंच, जेष्ठ खेळाडु, सातत्यपूर्ण स्पर्धा आयोजक संस्था व कबड्डी प्रसिद्धीसाठी अविरत मेहनत घेणाऱ्या जेष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात येतो. शिवाय कबड्डी खेळ, खेळाडु व संस्था यांच्या विकासासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या जेष्ठ संघटकाचा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो.
यावर्षी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली “१९ वा कबड्डी दिन” समारंभ, सोमवार दि. १५ जुलै, २०१९ रोजी सायंकाळी ५:०० वा रंगशारदा सभागृह, के. सी. मार्ग, लिलावती हॉस्पिटल जवळ, बांद्रा पश्चिम, मुंबई ४०००५० येथे आयोजित करण्यात आला आहे. कबड्डी दिन निमित्ताने राज्य संघटने कडून पुरस्कार जाहीर झाले आहेत. जाहीर झालेल्या पुरस्काराची यादी पुढीलप्रमाणे.
पुरस्कार यादी:
अ) किशोर व कुमार गट राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागी खेळाडूमधून
(स्व.बाबाजी जामसांडेकर, स्व.मुकुंद (अण्णा) जाधव व कबड्डी महर्षी स्व.शंकरराव (बुवा साळवी यांच्या स्मरणार्थ प्रत्येकी रुपये ५०००/- शिष्यवृत्ती, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह.)
किशोर मुले- १) पियुष पाटील, पालघर २) अमरसिंग कश्यप, रत्नागिरी ३) कृष्णा चव्हाण, परभणी
किशोरी मुली- १) रश्मी पाटील, रायगड २) ऋतू परब, मुंबई शहर ३) आकांक्षा बने, मुंबई उपनगर
कुमार मुले- १) पंकज मोहिते, मुंबई शहर २) अस्लम इनामदार, ठाणे ३) सौरभ पाटील, कोल्हापूर
कुमारी मुली- १) प्रतिक्षा तांडेल, मुंबई शहर २) काजल खैरे, मुंबई उपनगर ३) साक्षी रहाटे, मुंबई शहर
ब) किशोर गट राज्य स्पर्धेतील सहभागी खेळाडुमधून
(वडील स्व. रामचंद्र पुनाजी चव्हाण व आई स्व. सिताबाई रामचंद्र चव्हाण यांच्या स्मरणार्थ श्री. जगन्नाथ चव्हाण यांजकडून प्रत्येकी रुपये २५००/- शिष्यवृत्ती, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह.)
किशोर मुले- राहुल वाघमारे, पुणे
किशोरी मुली- समिक्षा कोल्हे, पुणे
क) वरीष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागी खेळाडूमधून
(स्व. मल्हारपंत बावचकर पुरस्कार श्री. कलाप्पा बा. आवडे यांजकडून प्रत्येकी रुपये ५०००/- पुरस्कार, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह)
सर्वोत्कृष्ट चढाईपटू (पुरुष)- मितेश चंद्रकांत पाटील, रायगड
सर्वोत्कृष्ट चढाईपटू (महिला)- आम्रपाली गलांडे, पुणे
ड) वरिष्ठ गट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील सहभागी खेळाडूंमधून उत्कृष्ट खेळाडु
(प्रत्येकी रुपये १०,०००/- पुरस्कार, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह)
स्व. मधु पाटील पुरस्कार- अजिंक्य पवार, रत्नागिरी
स्व. अरुणा साटम पुरस्कार- स्पर्धा झाली नाही.
इ) राज्य संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व अमृत कलश
जेष्ठ कार्यकर्ता- १) श्री. सुरेश पावसकर, रत्नागिरी २) श्री. कृष्णा तोडणकर, मुंबई शहर ३) श्री. लक्ष्मणराव सारोळे, लातूर
जेष्ठ पंच- १) श्री. बाळकृष्ण विचारे, मुंबई शहर २) श्री. लक्ष्मणराव मोहिते, उस्मानाबाद ३) श्री. अनंत शिंदे, मुंबई ४) श्री. लक्ष्मण जाधव, सोलापूर ५) श्री. शिवाजी खांडरे, औरंगाबाद
जेष्ठ खेळाडु- १) श्री. निवृत्ती बांगर, हिंगोली २) श्रीमती शुभांगी दाते जोगळेकर, पुणे
स्व.रमेश देवजी देवडीकर स्मृति श्रमयोगी कार्यकर्ता- श्री. ज्ञानदेव मुळे, औरंगाबाद
जेष्ठ पत्रकार– १) श्री. जयंत कुलकर्णी, औरंगाबाद (लोकमत) २) श्री. समीर सावंत (स्टार स्पोर्ट्स)
गुणानुक्रमे प्रथम जिल्हा– पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन
उत्कृष्ट स्पर्धा आयोजक- सह्याद्री युवा मंच, सिन्नर, नाशिक व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन
कृतज्ञता पुरस्कार- १) मा.आ. बाबाजानी दुराणी, परभणी २) श्री.पांडुरंग पार्टे, मुंबई उपनगर
कबड्डीदिन आयोजक- मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडु, जीवन गौरव, अर्जुन, कार्यकर्ते पुरस्कार-
शिवछत्रपती राज्य क्रीडा (खेळाडु) पुरस्कार मानकरी
१) नितीन मदने, सांगली (२०१४-१५ विशेष पुरस्कार)
२) विकास काळे, पुणे (२०१७-१८)
३) अद्वैता अशोक मांगले, ठाणे (२०१३-१४)
४) अभिलाषा म्हात्रे, मुंबई उपनगर (२०१४-१५ विशेष पुरस्कार)
५) किशोरी शिंदे, पुणे (२०१४-१५ विशेष पुरस्कार)
६) पूजा शेलार, पुणे (२०१५-१६)
७) कोमल देवकर, मुंबई उपनगर (२०१६-१७)
८) सायली केरीपाळे, पुणे (२०१७-१८)
शिवछत्रपती राज्य क्रीडा (कार्यकर्ता) पुरस्कार मानकरी
१) श्री. सूर्यकांत ठाकूर, रायगड (२०१४-१५)
२) श्री. सुनील जाधव, अहमदनगर (२०१४-१५)
३) श्री. माधव शेजुळ, परभणी (२०१५-१६)
४) श्री. पोपट पाटील, सांगली (२०१७-१८)
शिवछत्रपती राज्य क्रीडा (मार्गदर्शक) पुरस्कार मानकरी
१) श्री. अनंत शेळके, पुणे (२०१४-१५)
२) श्री. सुहास कदम, मुंबई उपनगर (२०१४-१५)
३) राजेश पाडावे, मुंबई शहर (२०१४-१५)
जीवन गौरव पुरस्कार
प्रा. गणपतराव माने, लातूर (२०१३-१४
अर्जुन पुरस्कार
अभिलाषा म्हात्रे, मुंबई उपनगर (२०१४-१५)