---Advertisement---

ज्याला भारताने नाकारले, त्याने इंग्लंड गाजवले..! अजिंक्य रहाणेची 9 चौकारांसह 71 धावांची वादळी खेळी

ajinkya rahane
---Advertisement---

Ajinkya Rahane : भारताचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून येथे उभय संघांना 3 सामन्यांची टी20 मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी भारतीय खेळाडू सराव सत्रात व्यस्त आहेत. मात्र यादरम्यान भारतीय संघाबाहेर असलेल्या एका खेळाडूने इंग्लंडमध्ये वादळी खेळी साकारत लाखो मने जिंकली आहेत. हा खेळाडू आणखी कुणी नसून अजिंक्य रहाणे आहे.

रहाणे जवळपास 12 महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमधून बाहेर आहे. त्याने जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर रहाणेला भारतीय क्रिकेटमधून पूर्णपणे हद्दपार करून टाकण्यात आले. मात्र ज्याला भारताने नाकारले, त्याच रहाणेने आता इंग्लंड गाजवले आहे.

भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याच्या एका संधीसाठी आसुसलेला रहाणे आता इंग्लंडमध्ये लीस्टरशायर संघाकडून वनडे कप स्पर्धा खेळतोय. या स्पर्धेतील नॉटिंगहमशायर संघाविरुद्धच्या सामन्यात रहाणेने वादळी खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना रहाणेने 60 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने 71 धावांची दमदार खेळी केली. विशेष म्हणजे, रहाणेने जेव्हा संघाला धावगती वाढवायची होती, अशावेळी ही खेळी केल्याने तिचे महत्त्व वाढले. रहाणेच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर लीस्टरशायर संघाला 50 षटकांत 6  बाद 369 अशी मोठी मजल मारता आली.

तसेच त्याने लीस्टरशायरचा कर्णधार लुईस हिल याच्यासोबत मिळून चौथ्या विकेटसाठी 82 धावांची दमदार भागीदारीही केली. लुईस हिल 81 धावा करुन बाद झाला.

भारताकडून 6 वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा वनडे
रहाणे हा भारतीय संघाचा मजबूत खेळाडू आहे. पण तो बऱ्याच दिवसांपासून वनडे आणि टी20 संघातून बाहेर आहे. रहाणेने भारतासाठी शेवटचा वनडे 2018 मध्ये खेळला होता. तर शेवटचा टी20 सामना 2016 मध्ये खेळला गेला होता. रहाणेने भारतीय संघासाठी 20 टी20 सामन्यात 375 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 90 वनडे सामन्यांमध्ये 2962 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त 85 कसोटी सामने खेळताना रहाणेने 5077 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहितने विश्वचषक खेळू नये, तो बेशुद्ध पडेल; माजी भारतीय क्रिकेटरनेच ‘हिटमॅन’ला हिणवले!
टीम इंडियापासून वेगळे होताच राहुल द्रविडला मिळाली मोठी जबाबदारी, आता या भूमिकेत दिसणार

जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारीवरून सूर्याला सोडावं लागलं होतं कर्णधारपद, मुंबई रणजी संघात झाला होता मोठा राडा!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---