भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. सध्या इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात देखील तो फारसा यशस्वी ठरला नाही. ज्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता अजिंक्य रहाणेने देखील टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पत्रकार परिषदेत एएनआयने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अजिंक्य रहाणे म्हणाला, “मला आनंद आहे की, लोकं माझ्याबद्दल बोलत आहेत. मला आधीपासूनच असे वाटते की, लोकं फक्त महत्वाच्या लोकांबद्दल बोलतात. या सर्व गोष्टी मला प्रेरणा देतात, देशासाठी खेळणे माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे.”
“मला टीकेचा त्रास होत नाही. लोकं फक्त महत्वाच्या लोकांबद्दल टीका करतात. मला आनंद आहे की, ते माझ्याबद्दल असे काही करत आहे. मी त्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो, ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहे. सांघिक कामगिरी हे माझे मुख्य उद्देश्य आहे. आपण आपल्या योजना आणि पद्धतीचा विचार करत असतो. शेवटी हे सर्व संघासाठीच असते.”
तसेच रहाणेने चेतेश्वर पुजाराचा बचाव करत म्हटले की, “दुसऱ्या कसोटी सामन्यात, माझी खेळी समाधानकारक होती. मी नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असतो. लॉर्ड्समध्ये खेळलेली ६१ धावांची खेळी समाधानकारक होती. पुजारा संथ गतीने फलंदाजी करत होता. परंतु, त्याची खेळी अत्यंत महत्वाची होती. त्याने फलंदाजी करताना २०० चेंडूंचा सामना केला होता. पुजारा आणि मी खूप वेळ फलंदाजी केली. आम्हाला माहीत होते की, या परिस्थितीत कशी फलंदाजी करायची आहे. आम्हाला फक्त संघासाठी चांगले योगदान द्यायचे आहे.”(Ajinkya Rahane epic reply over critics on his poor batting form and also backs Cheteshwar pujara)
लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेने ६१ तर चेतेश्वर पुजाराने ४५ धावांची खेळी केली होती. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विश्वचषकात पाच शतके झळकावूनही आनंदी नव्हता रोहित, ‘हे’ होते कारण
“विराट अत्यंत भाग्यशाली कर्णधार, ज्याकडे असे उत्कृष्ट दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत”
“ॲलिस्टर कूक अजूनही सलामीसाठी योग्य पर्याय”, दिग्गज इंग्लिश फलंदाजाचा इंग्लंड संघाला घरचा आहेर