भारतीय संघाचा अनुभवी कसोटी फलंदाज अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी रहाणेला भारतीय संघात संधी मिळाली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी रहाणे एका मुलाखातीत आंतरराष्ट्रीय पुनरागमनाविषयी व्यक्त झाला.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) मागच्या मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत नाहीये. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी 2022मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळला होता. वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपला शेवटचा सामना रहाणेने अनुक्रमे 2016 आणि 2018 साली खेळला होता. अजिंक्य रहाणेने बीसीसीआयसाठी नुकतीच मुलाखत दिली. यात भारतीय संघात पुनरागमन करणे, त्याच्यासाठी एक भावूक गोष्ट होती. बीसीसीआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात रहाणे म्हणतो की, “भारतीय संघात अंदाजे 18-19 महिन्यानंतर पुन्हा खेळण्याची संघी मिळमे माझ्यासाठी खरोखर खास गोष्ट आहे. या कठीण काळात माझ्या कुटुबियांनी माला पूर्ण साथ दिली. भारतीय संघाकडून खेळणे, हेच माझे आजही स्वप्न आहे.”
Emotions on #TeamIndia comeback ☺️
Preps for the #WTC23 ????
Support from family & friends ????In conversation with comeback man @ajinkyarahane88 ???????? – By @RajalArora
Full Interview ????????
https://t.co/hUBvZ5rvYD pic.twitter.com/vJINbplobY— BCCI (@BCCI) June 3, 2023
रहाणेने पुढे बोलताना कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. तो म्हणाला, “संघाच्या कर्णधाराची भूमिका रोहितने खरोखर चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. सर्वजण आपल्या परीने योगदान देत आहेत. रोहित आणि (केएल) राहुल अगदी चांगल्या पद्धतीने संघ सांभाळत आहेत.” दरम्यान, यावर्षी भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात संधी मिळाली आहे. अंतिम सामन्यात यावेळी भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघ आहे. मागच्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये बारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान होते आणि संघाने पराभव स्वीकारला होता. यावेळीही विजय भारतीय संघासाठीसाठी तसा अवघडच दिसत आहे. (Ajinkya Rahane is emotional after getting a chance to make a comeback in the Indian team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पंतसारखा किशनही लेफ्टी अन् आक्रमक, पण भरतकडे कसोटीचा अनुभव; WTC फायलनसाठी प्लेइंग 11चा दावेदार कोण?
अजहर आणि अजय जडेजाचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना, जाणून घ्या पुन्हा भारतीय जर्सीत का दिसले नाहीत