fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अजिंक्य रहाणेच्या मामाचा विहिरीत पडून मृत्यू; संगमनेर तालुक्यावर शोककळा

मुंबई | अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावात एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजणाच्या सुमारास घडली आहे. राधाकृष्ण गायकवाड असे या मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे यांचे मामा होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेंद्र गायकवाड हे दुपारी आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .

गायकवाड मोटार सुरु करण्यासाठी शेतात गेले होते, मात्र बराच वेळ होऊनही ते घरी परत न आल्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी त्यांचा शोधा शोध सुरु केली. बराच वेळ शोध घेऊनही ते सापडत नव्हते. संशय म्हणून एकाने विहिरीत डोकावून पाहिले असता राजेंद्र गायकवाड यांची चप्पल तिथे पडलेली दिसली. त्यानंतर गायकवाडही विहिरीत पडलेले दिसले.

गावकर्‍यांच्या मदतीने त्यांना बाहेर काढून लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथे गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

अजिंक्य भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असून तो मुंबईत रहातो. लाॅकडाऊनमुळे तो अंत्यविधीला उपस्थित होती की नाही याबद्दल कोणतेही वृत्त नाही. रहाणेने भारताकडून ६५ कसोटी, ९० वनडे व २० टी२० सामने खेळले आहेत.

You might also like