सिडनी | भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या कसोटी मालिकेसाठी आॅस्ट्रेलियात दाखल झाला आहे. याचा खास फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
२९ नोव्हेंबर भारतीय संघ तीन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर ६ डिसेंबर ते ७ जानेवारी २०१९ या काळात टीम इंडिया ४ कसोटी सामने खेळणार आहे.
याच मालिकेसाठी कसोटी संघातील रहाणे, पृथ्वी शाॅ आणि पार्थिव पटेल आज सिडनी शहरात दाखल झाले.
१६ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान झालेली भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अमधील अनाधिकृत कसोटी सामना खेळून हे खेळाडू आॅस्ट्रेलियात दाखल झाले आहेत.
रहाणेने आज फोटो शेअर केल्यावर केवळ २० मिनीटांत या फोटोला तब्बल ३० हजार लाईक्स मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा-
–१८ वर्षाच्या खेळाडूला लाजवेल अशी वसिम जाफरची चाळिशीत कामगिरी
–आजच्या सामन्यात होणाऱ्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही
–विराट- रोहितला आज रैनाचा विक्रम मोडण्याची संधी