भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज अजिंक्य रहाणे सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये रहाणेच्या नेतृत्वातील मुंबई संघ विजेतेपदसाठी दावेदार मानला जात आहे. असे असले तरी रहाणेला मात्र लवकरच भारतीय संघात पुनरगामन करायचे आहे. कसोटी स्पेशलिस्ट फलंदाजाने याविषयी इच्छा माद्यमांसमोर व्यक्त केली.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक राहिला आहे. अनेकदा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी कर्णधाराचीही भूमिका पार पाडली. रहाणेने जून 2023 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मैदानात पुनरागमन केले होते. त्याने या सामन्यात संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले, पण विजय मात्र भारताला मिळाला नाही. त्यानंतर वेस्ट इंडीज दौऱ्यात रहाणेला भारताचा कसोटी उपकर्णधार बनवण्यात आले. पण या दौऱ्यात त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. परिणामी रहाणेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. तसेच इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील माकिकेसाठीही त्याला संघात निवडले गेले नाहीये.
असे असले तरी, रहाणेने भारतासाठी खेळण्याच्या अपेक्षा अद्याप सोडल्या नाहीत. तो संघात पुनरागमन करेल, असा आशा त्याला अजूनही आहेत. यासाठी तो सराव आणि अपेक्षित सर्व प्रयत्न करत आहे. रणजी ट्रॉफी सुरू असताना रहाणेचे एक विधान समोर येत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार रहाणे म्हणाला आहे की, “माझे लक्ष्य रणजी ट्रॉफी जिंकणे आहे. तसेच भारताकडून 100 कसोटी सामनेही खेळायचे आहेत. सध्या मी पूर्ण लक्ष मुंबईकडून चांगले प्रदर्शन करण्यावर देत आहे. एका वेळी एका सामन्याचा विचार करत आहे.”
Rahane said “My goal is to secure both the Ranji Trophy & bigger objective of playing in 100 Test matches for India”. [TOI] pic.twitter.com/8ZU9LpzLrx
— Johns. (@CricCrazyJohns) January 16, 2024
दरम्यान, रहाणेने मागच्या वर्षी रणजी ट्रॉफीतील आपल्या प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघात पुनरागमन केले होते. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 135 धावांचे योगदान दिले होते. यात पहिल्या डावात रहाणेने 89 आणि दुसऱ्या डावात 46 धावांची खेळी त्याने केली होती. (Ajinkya Rahane’s react on comeback in Team India)
महत्वाच्या बातम्या –
BCCIमध्ये होणार महत्वाच्या पदासाठी भरती, वाचा कोण आणि असे करणार अर्ज?
‘हा’ संघ झिंबाब्वे क्रिकेटचे भाग्य उजळवेल; कर्णधाराने केले संघाचे कौतुक