भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेसाठी एक दु:खद बातमी समोर येत आहे. त्याची आजी झेलबाई यांचे निधन झाले आहे. याबद्दल अजिंक्यचे वडील मधूकर रहाणे यांनी माहिती दिली आहे.
रहाणेची इच्छा अपूर्ण
खरंतर रहाणे हा त्याच्या आजीच्या फार जवळ होता. तो अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या आजीबरोबरचे फोटो शेअर करत असायचा. तसेच पंजाब केसरीने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वीच रहाणेने इच्छा व्यक्त केली होती की त्याला आजीला भेटायचे आहे. पण त्याआधीच त्यांचे निधन झाले आहे. रहाणे त्याच्या आजीच्या फार जवळ होता. त्याच्या वडीलांनी सांगितले की कोरोनाच्या काळात त्यांना घरातूनच श्रद्धांजली वाहण्यात येईल. तसेच रहाणे सध्या आयपीएलच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.
रहाणे आयपीएलमध्ये व्यस्त
अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत आहे. आयपीएल २०२१ हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. यामुळे रहाणे दिल्ली कॅपिटल्स संघासोबत बायोबबलमध्ये आहे. दिल्लीचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जबरोबर १० एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यावर कोरोनाचे मोठे सावट आहे.
अजिंक्य रहाणेची आयपीएल कारकिर्द-
अजिंक्य रहाणे आयपीएलमध्ये १४९ सामने खेळला असून त्याने १४० डावांत ३१.७२च्या सरासरीने ३९३३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २८ अर्धशतकांचा समावेश आहे. तो आतापर्यंत राजस्थान रॉयल्स , रायझिंग पुणे सुपरजायंट्स व दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतातील सर्वात सुंदर स्टेडियमवर होणार आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषकाचा पहिला सामना!