Loading...

अजिंक्य रहाणेने शेअर केला लाडक्या लेकीचा पहिला फोटो

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शनिवारी(5 ऑक्टोबर) कन्यारत्न प्राप्त झाले. त्याची पत्नी राधिकाने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला.

Loading...

पण रहाणे त्याच्या मुलीच्या जन्माच्यावेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात व्यस्त होता. त्यामुळे त्याला त्याच्या पत्नीकडे आणि नवजात मुलीकडे जाता आले नव्हते. पण हा सामना काल(6 ऑक्टोबर) संपला. या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यानंतर रहाणे त्याच्या मुलीला आणि पत्नीला भेटला. त्याने सोशल मीडियावर पत्नी राधिका आणि मुलीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने ‘हॅलो’ असे कॅप्शन टाकले आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Loading...

रहाणे त्याच्या मुलीला भेटल्यानंतर पुन्हा 10 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे.

रहाणेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 15 आणि दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करताना 17 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 27 धावांची तुफानी खेळी केली होती.

View this post on Instagram

Our bundle of joy is here 🥰

A post shared by Radhika Rahane (@radhika_dhopavkar) on

Loading...
You might also like