आयपीएलमध्ये शनिवारी (16 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याआधी कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू दिनेश कार्तिकने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे इंग्लंडचा विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन याची केकेआरचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली होती. ओएन मॉर्गनची कर्णधार म्हणून निवड करणे हा निर्णय मला आवडला नाही असे भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज अजीत आगरकर याने सांगितले.
याबद्दल बोलताना आगरकर म्हणाला, “सात सामन्यांनंतर केकेआर गुणतालिकेत चौथ्या स्थानी असूनही कर्णधार बदलणे ही योग्य बाब नाही. यामुळे संघाचे नुकसान होते आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पराभवामुळे हे सिद्ध झाले. तो एक अवघड सामना होता.”
मॉर्गन कर्णधार झाल्यानंतर कोलकाताला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.
पुढे बोलताना आगरकर म्हणाला की, “ते योग्य पाऊल होते असे मला वाटत नाही. हंगामात आपण एका विशिष्ट कर्णधारासाठी एक योजना बनवत असतो. केकेआर गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असूनही हा निर्णय घेतल्याने मला आश्चर्य वाटले”
मात्र पुढच्या सामन्यात केकेआरने पुनरागमन केले आणि सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. केकेआर संघ नऊ सामन्यांत 10 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
केकेआरचा पुढील सामना बुधवारी (21 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे.न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज लॉकीं फेर्ग्युसनने केकेआर कडून खेळताना मागील सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. या सामन्यात तो कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
जबदस्त इच्छाशक्ती! एका कानाने ऐकू येत नाही, तरीही आरसीबीचा ‘हा’ खेळाडू गाजवतोय आयपीएल
‘त्या’ सामन्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, केएल राहुलने दिली प्रतिक्रिया
धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’