आयपीएल 2023 मध्ये मंगळवारी (11 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा खेळला गेला. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने अखेरच्या चेंडूवर रोमांचक विजय मिळवला. मुंबईच्या या विजयात युवा फलंदाज तिलक वर्मा याने महत्त्वाचे योगदान दिले. त्याच्या शानदार खेळीनंतर सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल व आकाश चोप्रा यांनी देखील तो लवकरच भारतीय संघात दिसेल, असे म्हटले.
दिल्लीविरूद्धच्या सामन्यात 173 धावांचा पाठलाग करताना ईशान बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर तिलक वर्मा याला बढती मिळाली होती. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या तिलक याने हा विश्वास योग्य ठरवला. त्याने रोहितला साथ देत दिल्लीच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने 29 चेंडूवर 1 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 41 धावा चोपल्या. त्याला मुकेश कुमार याने बाद केले. त्याने रोहितसह दुसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली. तिलकने हंगामातील पहिल्या सामन्यात आरसीबीविरुद्ध देखील 83 धावांची नाबाद खेळी केली होती.
त्याच्या या खेळीनंतर बोलताना आकाश चोप्रा व पार्थिव पटेल यांनी समालोचनावेळी त्याचे कौतुक केले. पटेल म्हणाला,
“आपण मागील दोन वर्षापासून त्याला पाहतोय. त्याला पारखण्याचा आणि त्याच्यासोबत जवळून काम करण्याचा मी अनुभव घेतला आहे. एक मोठा क्रिकेटपटू होण्याचे सर्व गुण त्याच्यात आहेत. तसेच तो भविष्यात संघाचे नेतृत्वही करू शकतो.”
आकाश चोप्रा याने म्हटले,
“तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत तिलकने शानदार खेळ दाखवला. तो ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे ते पाहून असे वाटते की तो लवकरच भारतीय संघासाठी खेळेल. त्याच्याकडे जबरदस्त टेंपरामेंट आहे.”
तिलक मागील वर्षीपासून मुंबई इंडियन संघाचा सदस्य आहे. त्याला मुंबईने साडेतीन कोटींची मोठी बोली लावत आपल्या संघात समाविष्ट केलेले. त्याने आपल्या पहिल्याच हंगामात 400 पेक्षा जास्त धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले.
(Akash Chopra And Parthiv Patel Praise Tilak Varma After His Inning Against Delhi Capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“चार सामने खेळण्याचा फिटनेस नाही आणि 14 कोटी घेतो”, चहरवर संतापले शास्त्री
आयपीएल सुरू असताना आयसीसी टी-20 रँकिंग जाहीर, खराब फॉर्मातील सूर्यकुमार ‘या’ स्थानावर