भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिला कसोटी सामना (19 सप्टेंबर) पासून सुरू होणार आहे. तत्पूर्वी 2 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय खेळाडू चेपॉकमध्ये घाम गाळत आहेत. त्यासाठी प्लेइंग इलेव्हनचेही चित्र हळूहळू स्पष्ट होताना दिसत आहे. पण दुलीप ट्रॉफीमध्ये (Duleep Trophy) उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या अक्षर पटेलला (Axar Patel) पहिल्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकतो.
पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, पहिल्या कसोटी सामन्यात तीन फिरकीपटू भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग असतील. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन शिवाय कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) संघात स्थान देण्यात येऊ शकते. दरम्यान वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज (Mohamad Siraj) आणि जसप्रीत बुमराह संघाचा भाग असतील. अष्टपैलू अक्षर पटेलला (Axar Patel) पहिल्या सामन्यातून बाहेर बसावे लागू शकते.
अक्षर पटेलने (Axar Patel) दुलीप ट्रॉफीमध्ये (Dileep Trophy) बॉल आणि बॅटसह चमकदार कामगिरी केली. अक्षरने पहिल्या डावात 80 धावांची शानदार खेळी केली, त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने 28 धावा करत इंडिया-डी संघाला योगदान दिले. त्याचबरोबर गोलंदाजीतही त्याने या सामन्यात 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.
पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: “भारताने सावध राहावे…” माजी खेळाडूचा भारताला सतर्कतेचा इशारा
सचिन 194 धावांवर खेळत असताना जेव्हा द्रविडने डाव केला होता घोषित, चोप्राने सांगितला तो किस्सा
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात एकही सामना न जिंकू शकलेले संघ