एका षटकात ५५ धावा फटकावत चर्चेत आलेला फलंदाज ऍलेक्स हेल्स याचे ३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर इंग्लंडच्या संघात पुनरागमन होऊ शकते. तो गेल्या दीर्घ काळापासून इंग्लंड संघातून बाहेर आहे. अखेर त्याला राष्ट्रीय संघात पुन्हा जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रतिबंधित औषधाचे सेवन केल्याने ऍलेक्सला संघाबाहेर केले गेले होते. परंतु इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांना ऍलेक्सच्या पुनरागमनाची शक्यता वाटत आहे.
वर्ष २०१९ मध्ये ऍलेक्सला (Alex Hales) इंग्लंडच्या विश्वचषक संघातून बाहेर करण्यात आले होते. कारण त्यावेळी एका अहवालात असे सांगितले गेले होते की, त्याने प्रतिबंधित औषधाचे सेवन केले आहे. याच कारणास्तव त्याच्या ३ आठवड्यांची बंदी लावण्यात आली होती. मात्र त्यानंतर तो इंग्लंड संघातील आपले स्थान परत मिळवू शकला नाही. परिणामी गेल्या ३ वर्षांपासून तो इंग्लंडचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या प्रतिक्षेत (Alex Hales Comeback) आहे.
परंतु आता ऍलेक्सला पुन्हा इंग्लंड संघात जागा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. रॉब कींनी याबाबत वक्तव्य करताना म्हटले की, “ऍलेक्सला त्या निर्णयात सहभागी लोकांशी बोलावे लागेल. परंतु माझ्या हिशोबाने तर ऍलेक्स निवडीसाठी उपलब्ध असेल.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ऍलेक्स हेल्सने गाजवले होते पदार्पण
ऍलेक्स वयाच्या १६व्या वर्षी २००५ मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. त्याने त्यावेळी लॉर्ड्स येथील एका टी२० स्पर्धेतील सामन्यातील एकाच षटकात ५५ धावा फटकावल्या होत्या. या एका षटकात ३ नो बॉल, ८ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. याखेरीज ऍलेक्स आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये शतक करणाराही पहिलाच इंग्लंडचा फलंदाज आहे.
त्याने आतापर्यंत इंग्लंडकडून ११ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २७.२९च्या सरासरीने ५७३ धावा केल्या आहेत. तसेच ७० वनडे सामने खेळताना त्याने २४१९ धावा केल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने ६० सामन्यांमध्ये इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. यादरम्यान ३१.०२ च्या सरासरीने त्याच्या बॅटमधून १६४४ धावा निघाल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ताशी १५०हून अधिकच्या गतीने चेंडू फेकणाऱ्या उमरान मलिकवर गांगुलीही फिदा; वाचा काय म्हणाला ‘दादा?’
पहिल्याच सामन्यात सॅमसनची विकेट घेणारा मुंबई इंडियन्सचा नवा भिडू आहे तरी कोण? जाणून घ्या एका क्लिकवर