आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा आणि टी-२० विश्वचषकाआधी सर्वत्र टी-२० क्रिकेटचा थरार सुरू आहे. कॅरिबियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये झालेल्या ३० व्या सामन्यातही याची प्रचिती आली आहे. सेंट किट्स अँड नेविस पेट्रियोट्स आणि ट्रिंबागो नाइट राइडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात ट्रिंबागोचा गोलंदाज अली खान याने तुफान गोलंदाजी करत फलंदाजांची तारांबळ उडवली आहे.
अली खानने या सामन्यात चार षटकांत १९ धावा देऊन ३ बळी घेतले. त्यातही त्याने एकाच षटकात दोन गडी बाद केले. त्यातील एक विकेट सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरली आहे.
अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अलीने २५ धावांवर खेळत असलेल्या शेरफेन रुदरफोर्डला आपल्या अद्भुत यॉर्करवर त्रिफळाचीत केले आहे. रुदरफोर्ड खेळपट्टीवर टिकून उभा होता, तेव्हा गोलंदाजी करण्यासाठी अली आला. त्याने चेंडू अशाप्रकारे हवेत स्विंग केला की चेंडूने फलंदाजाला काही कळायच्या आत ऑफ-स्टंप उडवला. रुदरफोर्ड या जबरदस्त यॉर्करवर बॅट उचलण्यापूर्वीच त्रिफळाचीत झाला होता.
विकेट घेतल्यानंतर अली खानने आक्रमक पद्धतीने आनंद साजरा केला, त्याचीही खूप चर्चा होतांना दिसत आहे. अलीव्यतिरिक्त ट्रिंबागो नाइट रायडर्सकडून इसुरु उडानाने २८ धावांत २ बळी घेतले.
सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्स संघाकडून जोशुआ डी सिल्व्हाने ४५ चेंडूत सर्वाधिक ५० धावा केल्या. तर कर्णधार ड्वेन ब्राव्होने १३ चेंडूत २५ धावांची आक्रमक खेळी केली. तरीही पॅट्रियट्सचा डाव २० षटकांत १४७ धावांवर आटोपला.
CASTLED!!! Ali Khan with a Spectacular wicket picks up our @fun88eng magic moment from match 30. #CPL21 #SKNPvTKR #CricketPlayedLouder pic.twitter.com/ihVEfAdOkB
— CPL T20 (@CPL) September 13, 2021
प्रत्युत्तरात कायरन पोलार्डच्या २२ चेंडूत ५१ धावांच्या धमाकेदार कामगिरीमुळे ट्रिंबागो नाइट रायडर्सने सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्सवर ४ विकेट्सने दमदार विजय मिळवला. या विजयानंतर त्यांनी सीपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले आहे. पहिल्या उपांत्य फेरीत ट्रिंबागो नाईट रायडर्सचा सामना चौथ्या स्थानावर असलेल्या सेंट लुसिया किंग्जशी होईल. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्सचा सामना तिसऱ्या स्थानावर असलेल्या गयाना अमेझॉन वॉरियर्सशी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये ठोकू शकतो ४० चेंडूत शतक, गौतम गंभीरचा विश्वास
Video: ‘मिस्टर ३६०’चा नेटमध्येही दिसला आक्रमक अंदाज, नेटमध्ये डिव्हिलियर्सने मारले हवाई फटके
विराटशी कोणतीही गोष्ट बोलताना डिव्हिलियर्सला वाटते भीती, कारण जाणून व्हाल चकीत