क्रिकेट सामन्यात साधारणतः चांगली कामगिरी करणाऱ्या एका खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार दिला जातो. पण क्रिकेट इतिहासात एकदा असेही झाले होते की, संघातील सर्वच ११ खेळाडूंना सामानावीराचा पुरस्कार दिला होता.
अशी ही अपवादात्मक घटना घडली होती ती ३ एप्रिल १९९६ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध विंडीज संघातील वनडे सामन्यात. या सामन्यात न्यूझीलंडने ४ धावांनी विजय मिळवला होता. या विजयानंतर या सामन्यात खेळलेल्या न्यूझीलंडच्या सर्व ११ खेळाडूंना सामनावीर पुरस्कार घोषित झाला होता.
झाले असे की सामन्यानंतर पंचांनी एका खेळाडूची सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यास नकार दिला. त्यामुळे संघातील सर्वच खेळाडूंना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्यातील ३ खेळाडू असेही होते, ज्यांनी दोन आकडी धावाही केल्या नव्हत्या आणि गोलंदाजीही केली नव्हती.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ३५.५ षटकात १५८ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून क्रेग स्पियरमनने सर्वाधिक ४१ धावा केल्या होत्या. तसेच त्यांनी विंडीजला ४९.१ षटकात १५४ धावांवरच सर्वबाद केले.
३ एप्रिल १९९६ ला न्यूझीलंड विरुद्ध विंडीज यांच्यातील वनडे सामन्यात न्यूझीलंड संघातील सर्व ११ खेळाडूंना मिळाला होता सामनावीर पुरस्कार. या सामन्यात न्यूझीलंडने ४ धावांनी विजय मिळवला होता. #म #मराठी @marathirt @MarathiBrain @maha_sports pic.twitter.com/b6dfxEA54Q
— Pranali Kodre (@Pranali_k18) April 3, 2018
या ११ खेळाडूंना मिळाला होता एकाच सामन्यात सामनावीर पुरस्कार
नॅथन ऍस्टल
ख्रिस केर्न्स
स्टीफन फ्लेमिंग
ली जर्मोन
ख्रिस हॅरीस
गॅव्हीन लार्सन
दीपक पटेल
क्रेग स्पीयरमन
शेन थॉमसन
रॉजर ट्वोस
जस्टीन वॉगन
महत्त्वाच्या बातम्या –
Video: भारताच्या त्रिशतकवीराने तोडले चहलचे हॅट्रिकचे स्वप्न, पण फिरकीपटूने दाखवली खिलाडूवृत्ती
कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवणारा मुंबईकर ‘निलेश कुलकर्णी’
Video: नुसती निराशा… राजस्थानविरुद्ध रोहित फक्त १० धावा करून बाद, पत्नी रितिकाने मुरडले नाक