पुणे,दि.6 नोव्हेंबर 2023: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या तेराव्या ओम दळवी मेमोरियल डॉ.नितु मांडके करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत पार्थ देवरुखकर, जय पवार, आर्यन घाडगे, ओंकार शिंदे अर्णव बनसोडे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत पाचव्या मानांकित फतेहब सिंगने रौनक लालवानीचा 6-0, 6-1 असा सहज पराभव केला.चुरशीच्या लढतीत नीरज रिंगणगावकर याने क्वालिफायर अर्चित धूतचा टायब्रेकमध्ये 7-6(2), 2-6, 6-0 असा संघर्षपूर्ण पराभव केला. लकी लुझर ठरलेल्या कर्नाटकच्या सुहास सोमाने महाराष्ट्राच्या आशुतोष कवडीकरवर 6-0, 6-1 असा सहज विजय मिळवला.
अटीतटीच्या सामन्यात आर्यन घाडगेने स्वराज ढमढेरेचा 7-5, 2-6, 7-5 असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसरी फेरी गाठली. अर्णव बनसोडेने सनय सहानीचा 6-4, 7-6(5) असा तर सहाव्या मानांकित ओंकार शिंदेने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करणाऱ्या अयान शेट्टीचा 7-6(5), 7-5 असा पराभव करून आपली आगेकूच कायम राखली. क्वालिफायर तामिळनाडूच्या प्रणव एसआर याने आपला राज्य सहकारी अथ्रेया हायाग्रीवेला 7-5, 6-1 असे पराभूत केले.
निकाल: पहिली फेरी: मुले:
पार्थ देवरुखकर(महा)(1)वि.वि.अर्चित डहाळे(महा) 6-0, 6-1;
अर्णव बनसोडे(महा)वि.वि.सनय सहानी 6-4, 7-6(5);
आदित्य अय्यंगर(महा)वि.वि.रोहन बजाज(महा) 6-2, 5-7, 6-3;
ओंकार शिंदे(महा)(6)वि.वि.अयान शेट्टी(महा) 7-6(5), 7-5;
जय पवार(महा)(3)वि.वि.इशान खडीर(कर्नाटक) 6-0, 6-1;
सुहास सोमा(कर्नाटक)वि.वि.आशुतोष कवडीकर(महा) 6-0, 6-1;
आर्यन घाडगे (महा)वि.वि.स्वराज ढमढेरे(महा) 7-5, 2-6, 7-5;
पार्थ सोमाणी(महा)(8)वि.वि.क्रिश मर्चंट(महा) 6-1, 6-1;
फतेहब सिंग(महा)(5)वि.वि.रौनक लालवानी(महा) 6-0, 6-1;
नीरज रिंगणगावकर (महा)वि.वि.अर्चित धूत (मह) 7-6(2), 2-6, 6-0;
नील जोगळेकर (महा)वि.वि.सर्वेश झवर (महा) 7-6(3), 6-2;
अनमोल नागपुरे(महा)(4)वि.वि.नचिकेत गोरे(महा) 6-0, 6-0;
सार्थ बनसोडे(महा)(7)वि.वि.नीव कोठारी(महा) 6-3, 2-6, 6-1;
प्रणव एसआर(तामिळनाडू)वि.वि.अथ्रेया हायाग्रीवे(तामिळनाडू) 7-5, 6-1;
महत्वाच्या बातम्या –
असा घेतला बदला! थेट हातातलं घड्याळ दाखवत मेथ्थ्यूने शाकिबला दाखवला रस्ता
जेव्हा गांगुली Time Out बाद होता होता राहिलेला, पण स्मिथने दाखवलेली खिलाडूवृत्ती, वाचा काय घडलेलं