---Advertisement---

IPL 2024मधून बाहेर पडलेल्या ‘या’ खेळाडूच्या गुडघ्याची सर्जरी, फोटो पाहिला का?

CSK
---Advertisement---

Ben Stokes Surgery: आयपीएल 2024 स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्स संघाच्या स्टार खेळाडूने नाव मागे घेतले होते. या खेळाडूला आयपीएलच्या मागील हंगामातही घोट्याट्या दुखापतीमुळे फक्त 2 सामनेच खेळता आले होते. अशात या खेळाडूने गुडघ्याची सर्जरी केली आहे. असे म्हटले जात आहे की, हा खेळाडू बरा होऊन भारत विरुद्ध इंग्लंड संघात जानेवारी 2024मध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचा भाग बनू शकतो.

‘या’ खेळाडूने केली गुडघ्याची सर्जरी
इंग्लंडचा 32 वर्षीय अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेतून नाव मागे घेतले होते. आता त्याने गुडघ्याची सर्जरीही केली आहे. खरं तर, स्टोक्स मागील 18 महिन्यांपासून गुडघ्याच्या जुन्या समस्येने त्रस्त होता. तो विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतही फलंदाज म्हणूनच खेळला होता. त्याने आता सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आपल्या सर्जरीविषयी माहिती दिली आहे. त्याने यावेळी त्याचे रिहॅबही सुरू होईल अशी माहिती दिली आहे.

भारताविरुद्धच्या कसोटीत खेळू शकतो स्टोक्स
भारतात इंग्लंडच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये सुरुवात होईल. भारतासाठी रवाना होण्यापूर्वी दोन किंवा तीन दिवसांपूर्वी इंग्लंड संघाचा यूएईमध्ये एक छोटा ट्रेनिंग कॅपही असेल. भारताविरुद्धच्या या मालिकेत स्टोक्सला अष्टपैलू म्हणून खेळायचे आहे.

स्टोक्सची आयपीएल कारकीर्द
बेन स्टोक्स आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत फक्त 45 सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने 935 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, त्याने आयपीएलमध्ये 28 विकेट्सही नावावर केल्या आहेत. (all rounder ben stokes undergoes knee surgery ahead of india tour for test series 2023)

हेही वाचा-
…तर सूर्यकुमार यादवच होणार पुढचा कर्णधार, विश्वचषकातही करेल नेतृत्व!
‘बॉलर्सचा उपयोगच काय, त्याऐवजी मशीन वापरा’, भारतीय दिग्गजाची घणाघाती टीका

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---