पुणे। रोहित जाधवच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर ऑल स्टार संघाने पूना क्लबच्या वतीने आयोजित पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत वेव्हज संघावर ८ गडी राखून मात केली. वेव्हज संघाने दिलेले ७३ धावांचे लक्ष्य ऑल स्टार संघाने २ गडींच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.
स्पर्धेचे उद्घाटन जेट सिंथेसिसचे अध्यक्ष राकेश नवाणी, जितेंद्र घडोक ग्रुपचे जितेंद्र घडोक, आदर्श हेगडे, सचिन राठी, पूना क्लबचे अध्यक्ष राहुल ढोले पाटील, उपाध्यक्ष नितीन देसाई, स्पोर्टस चेअरमन शशांक हळबे आणि सदस्यांच्या उपस्थितीत झाले. जेट सिंथेसिस,मदर्स रेसिपी आणि जितेंद्र घडोक ग्रुप हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. स्पर्धेचे यंदा ७ वे वर्ष आहे.
पूना क्लबच्या मैदानावर सोमवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. यातील सलामीच्या लढतीत ऑल स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. वेव्हज संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकांत ३ बाद ७२ धावा केल्या. यात आदीश शहाने २० चेंडूत ६ षटकार व २ चौकरासह नाबाद ५८ धावा केल्या. ऑल स्टार संघाने विजयी लक्ष्य ५.५ षटकांत पुर्ण केले. यात रोहित जाधवने ३ चौकार व ३ षटकारसह नाबाद ५१ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक।
वेव्हज – ६ षटकांत ३ बाद ७२ (आदीश शहा नाबाद ५८, अमिताब अगरवाल १-६, रोहित आचार्य १-३, हिरेन परमार १-१२) पराभूत वि. ऑल स्टार – ५.५ षटकांत २ बाद ७३ (रोहित जाधव नाबाद ५१, रोहित आचार्य १७, झमीर शेख १-११).