ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाचा अखेरचा आठवडा सुरू झाला आहे. साखळी फेरीतील केवळ चार सामने शिल्लक असले तरी, न्यूझीलंड वगळता अद्याप तीन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होणे बाकी आहे. या विश्वचषकात अनेक अनुभवी तसेच नव्या दमाच्या खेळाडूंनी सर्वांचे मन जिंकलेय. मात्र, या दरम्यानच जवळपास सर्वच संघांचे कर्णधार पूर्णपणे अपयशी झालेले दिसून येतात.
टी20 विश्वचषक 2022 हा सर्वच प्रमुख संघांच्या कर्णधारांसाठी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. रोहित शर्मापासून ऍरॉन फिंच, शाकिब अल हसन तसेच केन विलियम्सन या प्रत्येक कर्णधाराने आपल्या कामगिरीने चाहत्यांना निराश केले आहे. या विश्वचषकातील सर्व कर्णधारांची आतापर्यंतची सरासरी आणि स्ट्राईक रेट टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वात कमी आहे. टी20 विश्वचषक 2022 मध्ये सर्व कर्णधारांची एकत्रित फलंदाजी सरासरी केवळ 17.84 तर स्ट्राइक रेट 107.02 असा आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, तो 4 सामन्यात 1 अर्धशतकांसह केवळ 74 धावा करण्यात त्याला यश आले आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची परिस्थिती सर्व कर्णधारांमध्ये खराब दिसून येते. बाबरने या स्पर्धेत 3.50 च्या सरासरीने केवळ 14 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात केवळ तीनच कर्णधार असे आहेत ज्यांना 100 पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. आयर्लंडचा कर्णधार ऍण्ड्रू बालबिर्नी 153 धावांसह या यादीत पहिल्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने 131 तर ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंचे 107 धावा काढण्यात यश मिळवले आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने 3 सामन्यात 91 धावा, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमाने 4 सामन्यात 50, बांगलादेशचा शाकिब अल हसनने 4 सामन्यात 44 आणि अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने 3 सामन्यात 17 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग: विश्वचषकातून बाहेर पडताच गंभीर आरोप लावत नबीने सोडले अफगाणिस्तानचे कर्णधारपद
शार्दुलने धोनीबद्दल केला मोठा खुलासा; जे काही म्हणाला, त्याने ‘माही’वरील तुमचंही प्रेम आणखी वाढेल