नेपाळी क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळलेला संदीप लामिछाने याच्यावर नेपाळमधील 17 वर्षीय तरुणीने बला’त्काराचा आरोप केला आहे. दरम्यान, एका अल्पवयीन मुलीने केलेल्या बला’त्काराच्या तक्रारीनंतर नेपाळ पोलिसांनी या खेळाडूविरुद्ध तपास सुरू केला आहे. याप्रकरणी काठमांडू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लामिछाने सध्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) खेळत आहे. आपल्यावरील गंभीर आरोपांबाबत त्यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
नेपाळीमधील एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, काठमांडू जिल्हा पोलीस श्रेणी प्रमुख भरत बहादूर बोहोरा यांनी सांगितले की, शहरातील गोशाळेतील पोलीस वर्तुळात बुधवारी तक्रार दाखल केली. या प्रकरणारात पुढील तपास सुरू आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक, रिषभमध्ये फलंदाजी क्रमावरून कंफ्यूजन, शेवटी पंतचा पडला चेहरा; पाहा काय झाले?
VIDEO: रोहितने रागात मारला भुवनेश्वर कुमारला बॉल! कर्णधाराच्या लाजीरवाण्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल
चिंता नको! सलग 2 पराभवांनंतरही भारत गाठू शकतो फायनल, अशी आहेत समीकरणे