---Advertisement---

नेपाळकडून आशिया चषकात अप्रतिम पदार्पण! पाकिस्तानने स्वस्तात गमावल्या पहिल्या दोन विकेट्स

On: बुधवार, ऑगस्ट 30, 2023 4:26 PM
---Advertisement---

आशिया चषक 2023 बुधवारी (30 ऑगस्ट) सुरू झाला. जयमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात स्पर्धेचा पहिला सामना मुलतानमध्ये खेळला गेला. नेपाळ संघ पहिल्यांदाच आशिया चषकात खेळत आहे. मात्र, पहिल्याच सामन्यात नेपाळचे गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसले. पाकिस्तानने सुरुवातीच्या दोन विकेट्स स्वस्तात गमावल्या.

पाकिस्तान आणि नेपाळ (Pakistan vs Nepal) यांच्यातील हा सामना दुपारी 3 वाजता सुरू झाला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. फखर झमान आणि इमाम उल हक (Imam-ul-Haq) पाकिस्तानसाठी डावाची सुरुवात करण्यासाठी आले. मात्र, संघाची धावसंख्या 25 असताना दोन्ही सलामीवीरा तंबूत परतले होते. फखर झमान (Fakhar Zaman) करन केसी (Karan KC) याच्या चेंडूवर यष्टीरक्षक आसिफ शेख (Ashif Shaikh) याच्या हातात झेलबाद झाला. वैयक्तिक 14 धावांवर त्याने विकेट गमावली. त्यानंतर इमाम-उल-हक 14 चेंडत 5 धावा करून धावबाद झाला. रोहित पौडेल (Rohit Poudel) याने अप्रतिम थ्रो केला, जो थेट स्टंप्सवल बसला आणि इमामला खेळपट्टी सोडावी लागली.

तिसऱ्या क्रमांकावर आलेला कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि चौथ्या क्रमांकावर आलेला यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) यांनी आपल्या डावाची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली. दोघांमध्ये 68 चेंडूत अर्धशतकासाठी (53*) भागीदारी देखील झाली होती. (Amazing debut from Nepal in Asia Cup! Pakistan lost the first two wickets cheaply)

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाकिस्तान – फखर झमान, ईमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, आघा सलमान, शादाब खान, मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ.

नेपाळ – कुशल भुरटेल, आसिफ शेख (यष्टीरक्षक), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी.

महत्वाच्या बातम्या – 
भारतीय संघ आशिया कपसाठी श्रीलंकेला रवाना, तिलक-जडेजाने केले फोटो शेअर
दिग्गज खेळाडू आशिया चषकापूर्वी संघातून पडला बाहेर, सर्वत्र उडाली खळबळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---