सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. मायदेशात सुरू असेलेल्या या टी२० मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने आफ्रिकी संघाने तरे एक सामना भारताने जिंकला. उभय संघातील चौथा टी२० सामना शुक्रवारी (१७ जून) राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. त्यात भारताचा कर्णधार रिषभ पंतला फलंदाजीत काही नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा २०१९च्या विश्वचषकाच्या अंबाती रायडुच्या चयनावरचे वादळ निर्माण झाले आहे.
माजी सलामीवीर गौतम गंभीर म्हणला की,” अंबाती रायडूचा २०१९च्या विश्वचषकाच्या संघात समावेश न होणे दुर्दैवी आहे. त्याचबरोबर रिषभ पंतला ज्या प्रकारे संधी मिळाली आणि त्याचे तो फायदा घेऊ शकला नाही, त्या अर्थाने त्यांच्याबद्दल वाद घालण्यात अर्थ नाही. केवळ तीन अपयश पाहून रायुडूला विश्वचषक संघातून वगळण्यात आले हे दुःखद आहे, हाही चर्चेचा विषय आहे. या फलंदाजाने ४८ च्या सरासरीने धावा केल्या आहेत आणि तरीही त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. संघ निवडीतील इतर निर्णयांपेक्षा हे माझ्यासाठी अधिक दुःखद आहे.”
पुढे बोलताना गंभीर म्हणाला की, “रायडूच्या संघात समावेश न होण्याने मला माझे दिवस आठवले. मला २००७ विश्वचषकासाठी निवडण्यात नव्हते आले त्यामुळे मला ही वाईट वाटले होते. मला माहिती होते की संघाला माझी गरज आहे. मी ही क्रिकेट सोडण्याचा विचार केला होता. प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. त्यामुळेच मला रायडुसाठी वाईट वाटत आहे. पंतच्या जागी दिनेश कार्तिकची निवड करण्याचा मुद्दा आला तेव्हा पंतला खूप संधी मिळाल्या पण त्याचा फायदा उठवता आला नाही. दिनेश पंतपेक्षा अनुभवी आहे, त्याचा फायदा त्याला झाला आहे. माझ्या मते संजू सॅमसन हा दुसरा यष्टिरक्षक म्हणूनही सर्वोत्तम आहे. तो चांगला फलंदाज असून चौथ्या क्रमांकावर खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिकेत आगामी टी२० विश्वचषकासाठीचे खेळाडू निवडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत, इशान किशन, दिनेश कार्तिक आणि संजू सॅमसम यांचा समावेश आहे. त्यामुळे विश्वचषकात कोणाला संघात स्थान मिळेल हे सांगणे सध्या अबघड आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इंग्लंडचा गड राखण्यासाठी भारतीय ‘शिलेदार’ तयार; सरावाला केली सुरूवात
INDvsSA T20: अर्शदीप की उमरान कोणाला मिळणार चौथ्या सामन्यात संधी? वाचा भारतीय दिग्गजाने काय सांगितले