पाकिस्तान संघ सद्या दिवसेंदिवस खराब कामगिरी करत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही संघातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा घरात घुसून पराभव केला होता. बांगलादेशने ही मालिका 2-0ने खिशात घातली आणि ऐतिहासिक विजय मिळवला. तत्पूर्वी 2024च्या टी20 विश्वचषकात अमेरिकेसारख्या संघाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता, तर आता अमेरिकेच्या एका खेळाडूने पाकिस्तानबद्दल मोठे वक्तव्य करत त्यांची खिल्ली उडवली आहे.
पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन वेगवान गोलंदाज अली खानचा (Ali Khan) एक व्हिडिओ सोशल मीडिया एक्स प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अली खान म्हणाला, “मला वाटते की, जर आम्हाला पुन्हा त्यांच्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली तर पाकिस्तानला पुन्हा पराभूत करण्याची ताकद आमच्यात आहे. त्यांचा अनादर नाही पण मला वाटते आमची बाजू खूप चांगली आहे.”
पुढे बोलताना अली खान (Ali Khan) म्हणाला की, “एकदा आम्ही पूर्ण ताकदीने खेळलो की आम्ही पाकिस्तानलाच नव्हे तर कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. मात्र, आम्हाला पुन्हा पाकिस्तानसोबत खेळण्याची संधी मिळाली तर चांगले होईल.”
Ali Khan “no disrespect to Pakistan but we are capable of beating them again” #Cricket pic.twitter.com/aMAcaniCFA
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) September 10, 2024
2024च्या टी20 विश्वचषकात ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेने सामना जिंकला होता. या सामन्यात अली खानने (Ali Khan) अमेरिकेसाठी शानदार गोलंदाजी करत 4 षटकात 30 धावा देत 1 विकेट घेतली होती. अली खान व्यतिरिक्त भारतीय वंशाचा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने 4 षटकात 18 धावा देऊन पाकिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले होते.
2024च्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानने 3 सामने खेळले त्यामध्ये त्यांनी केवळ एक विजय मिळवला होता. पाकिस्तान संघ कॅनडाविरूद्ध सामना जिंकू शकला होता. भारत आणि अमेरिका या संघांनी पाकिस्तानला धूळ चारली होती. पाकिस्तान संघ सुपर-8च्या फेरीसाठी देखील पात्र ठरू शकला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनचा ‘महान’ रेकाॅर्ड मोडणार ‘हा’ दिग्गज खेळाडू? असं आहे समीकरण
ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ स्टार खेळाडू होणार निलंबित? मोठे कारण समोर
जेतेपद गमावले, तरीही छप्परतोड कमाई; वनडे विश्वचषक 2023 नंतर भारताने कमावले 11 हजार कोटी