जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या सामन्याचा पहिला दिवस हा पावसामुळे रद्द करण्यात आला. अद्याप उभय संघांमध्ये नाणेफेकही झालेली नाही. साउथम्प्टनमध्ये पावसाच्या वातावरणामुळे खेळपट्टीमध्ये काही फरक जाणवू शकतो. या ऐतिहासिक सामन्यापुर्वी भारतीय फिरकीपटू अमित मिश्रा यांनी आपले मत स्पष्ट केले आहे.
अमित मिश्रा यांचा असा विश्वास आहे की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी खेळपट्टी व हवामान स्थितीचा फायदा भारतापेक्षा न्यूझीलंडला अधिक होईल. इंग्लंडमध्ये खेळण्याचा बहुतेक भारतीय फलंदाजांना अनुभव नाही. तर न्यूझीलंडचे खेळाडू लहानपणापासूनच स्विंग गोलंदाजीचा सामना करीत आहे. जेके २४x७ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अमित मिश्रा बोलत होते.
इंग्लंडमधील परिस्थितीचा सामन्यावर काय परिणाम होईल? असे विचारले असता मिश्रा यांनी उत्तर दिले की, “बुमराह, शमी आणि इशांत यांना इंग्लंडच्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव आहे. परंतु न्यूझीलंडचे फलंदाज लहानपणापासूनच अशा परिस्थितीत खेळत आहेत. भारतातील परिस्थती इंग्लंडपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. मला असे वाटते की, दोन किंवा तीन भारतीय फलंदाजांना इंग्लंडमध्ये खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. तर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही अशाच प्रकारच्या परिस्थितींचा सामना केला आहे.”
न्यूझीलंडचे जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात जास्त वर्चस्व
अमित मिश्रा म्हणाला, “इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी खेळपट्टी उपयुक्त ठरत असल्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणे भारताला सोपे होणार नाही. इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील परिस्थिती काहीशी सारखीच आहे. म्हणूनच माझा असा विश्वास आहे की न्यूझीलंडचा पारडे जास्त जड आहे.”
“तरीही मी भारतीय संघाला पाठिंबा देत आहे. परंतु इंग्लंडमधील परिस्थिती भारतीय संघाच्या अनुकूल असू शकत नाही. भारतासाठी हे अवघड होईल. त्यांना जास्त कष्ट घ्यावे लागतील. माझ्या मते न्यूझीलंडला फायदा होईल कारण जेव्हा चेंडू हवेत स्विंग करतो अशावेळी त्यांनी अधिक खेळ खेळला आहे.”
महत्वाच्या बातम्या
पावसाची रिमझिम चालू असताना भारतीय क्रिकेटपटू खेळत होते ‘हा’ खेळ, पाहा व्हिडिओ
प्रशिक्षक, मार्गदर्शक अन् प्रेरक; भारतीय संघाच्या WTC प्रवासामधील ‘नायका’चा व्हिडिओ पाहिलाय का?
पदार्पणाच्या कसोटीत शेफालीचा वर्ल्डरिकॉर्ड, सचिनच्या ‘या’ विक्रमाच्या यादीत मिळवलं स्थान