fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

एशियन गेम्स: ….म्हणून झाले सुवर्णपदक विजेत्या भारतीय बॉक्सरला अश्रू अनावर

१८ व्या एशियन गेम्समध्ये भारताला बॉक्सर अमित पांघलने शनिवारी सुवर्णपदक मिळवून दिले यावेळी त्याला पदक वितरणामध्ये राष्ट्रगीत ऐकून रडू कोसळले. त्याने हे सुवर्णपदक बॉक्सिंगच्या लाइट फ्लाय प्रकारात (४९ किलो वजनीगटात) मिळवले आहे.

अमितने अंतिम सामन्यात आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबॉय दुस्मातोव्हचा ३-२ ने पराभव केला. हे पदक भारतासाठी खूप खास ठरले कारण भारताचे एशियन गेम्समधील आत्तापर्यंतचे बॉक्सिंगमधील हे आठवे सुवर्णपदक आहे.

या लढतीत अमितने उझबेकिस्तानच्या दुस्मातोव्हला रोखून ठेवण्यासाठी उत्तम बचावात्मक तंत्र वापरले. त्याने दुस्मातोव्हत्याच्या अॅटॅकचा चांगला प्रतिकार केला. त्यामुळे त्रासलेल्या दुस्मातोव्हवर विजय मिळवण्यास अमितला मदत झाली.

२२ वर्षीय अमित हा भारतीय लष्कर दलात आहे. त्याने याआधी मागील वर्षी एशियन चॅम्पियशिपमध्ये कांस्यपदक मिळवले होते. तसेच यावर्षी गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने रौप्यपदक मिळवले होते.

तसेच या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या विकास क्रिशनने ७५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे.

अमितच्या आधी  २०१०च्या गुआनझोऊ एशियन गेम्समध्ये विजेंदर सिंग आणि विकास क्रिशन तर २०१४ मध्ये एमसी मेरी कोम यांनी सुवर्णपदकाची कामगिरी केली आहे.

इंडोनेशियात पार पडलेल्या या १८व्या एशियन गेम्समध्ये भारत पदतालिकेत आठव्या स्थानावर असून एकूण ६९ पदके पटकावली आहेत. यात १५ सुवर्ण, २४ रौप्य आणि ३० कांस्य पदकांचा समावेश आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: समारोप सोहळ्यासाठी हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल असणार ध्वजधारक

ड्वेन ब्रावोकडून टी२०त षटकारांची बरसात, केली धमाकेदार खेळी

वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

You might also like