मागील काही दिवसांपासून मुंबई क्रिकेट संघ नव्या प्रशिक्षकाच्या शोधात होता. यासाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितला होता. त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे काही दिग्गज खेळाडूंनी प्रशिक्षकपदासाठी अर्द दाखल केले होते. आता त्यांचा हा शोध संपला असून प्रथम श्रेणीचे माजी क्रिकेटपटू अमोल मुझूमदार यांना मुंबई संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले असल्याचे समजत आहे.
मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनीही अर्ज केला होता. जाफरशिवाय साईराज बहुतुले, अमोल मुझूमदार, भारताच्या १९८३ विश्वचषक विजेत्या संघाचे माजी वेगवान गोलंदाज बलविंदरसिंग संधू यांनी देखील मुंबईचे प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज दिला होता. त्यातून आता ३३ शतके करणाऱ्या मुझूमदार यांची निवड करण्यात आली आहे. सीआयसीच्या जतीन परांजपे, निलेश कुलकर्णी व विनोद कांबळी या तीन सदस्यांनी ही निवड केली आहे.
It's official. Amol Muzumdar has been appointed head coach of Mumbai's senior side @amolmuzumdar11 @MumbaiCricAssoc @sportstarweb
— Amol Karhadkar (@karhacter) June 1, 2021
४६ वर्षीय मुझूमदार यांना त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत कधी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्यांनी देशांतर्गत क्रिकेटचे मैदान गाजवले आहे. देशांतर्गत स्तरावरील टी२० क्रिकेटमध्ये त्यांनी मुंबई संघाचेही प्रतिनिधित्व केले होते.
मुझूमदार यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल १७१ सामने खेळले होते. दरम्यान ४८.१३ च्या सरासरीने फलंदाजी करताना त्यांनी ११ हजारपेक्षाही जास्त धावा चोपल्या होत्या. यात त्यांच्या ३० शतके आणि ६० अर्धशतकांचा समावेश होता. याबरोबरच अ दर्जांच्या क्रिकेट सामन्यातही ३ शतकांसह ३२८६ धावांची नोंद केली होती.
आता मुझूमदार क्रिकेटपटूनंतर क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी कशाप्रकारे पार पाडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तर भारताला कोणीही पराभूत करु शकणार नाही’, अक्षर पटेलने सांगितले कारण
पंजाब किंग्जचा ‘हा’ खेळाडू अडकला विवाहबंधनात, खास कॅप्शन देत शेअर केले फोटो
खुलासा! धावांचा रतीब घालणाऱ्या रोहितने ‘या’ खेळाडूच्या बॅटने झळकावले होते पहिले अर्धशतक