भारतीय महिला क्रिकेट संघाला (India Womens Cricket Team) ऑस्ट्रलियाविरुद्द झालेल्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय महिला संघ तिसऱ्या सामन्यातही पराभूत झाल्याने ही मालिका गमवावी लागली. सामन्यानंतर भारतीय महीला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजूमदार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संघ मालिका न जिंकल्याच्या काही महत्वाच्या कारणांचा उल्लेख केला.
असा झाला तीसरा टी20 सामना
मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलल्या तिसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारताचा 7 विकेटने पराभव केला. यासोबतच तीन सामन्यांची टी20 मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ निर्धारीत 20 षटकांत 147/6 एवढी धावसंख्या उभी करु शकला. याच्या प्रतिउत्तरादाखल ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारीत लक्ष 18.4 षटकात केवळ तीन विकेट गमावून प्राप्त केले. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून एनाबेल सदरलॅंड हिला तिच्या गोलंदाजीसाठी(2/12) सामनावीर घोषीत केले. यासोबतच एलिसा हीली(89 धावा) हीला मालिकावीर घोषीत करण्यात आले.
फिल्डींग आणि फिटनेसमध्ये सुधारणा करण्याची गरज – अमोल मजूमदार
भारतीय महीला संघाने पहिला सामना जिंकून तीन टी20 सामन्यांच्या मालिकेची जबरदस्त सुरवात केली होती. यानंतर उर्वरीत दोन सामन्यात मात्र संघाला पराभवाला तोंड द्यावे लागले. तिसऱ्या टी20 सामन्यात झालेल्या पराभवानंतर संघाच्या मुख्य प्रशिक्षकांनी खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणावर आणि फिटनेसवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, “निर्धारीत षटकांच्या क्रिकेट सामन्यात क्षेत्ररक्षण आणि फिटनेस यावर विषेश लक्ष द्यावे लागेल. आशा आहे की पुढील काही महिन्यांमध्ये मला यावर काम करण्याची संधी मिळेल. एक संघ म्हणुन या काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये सुधारणा करायला हवी. यासोबतच आम्हाला डीआरएस कधी घ्यायचा यामध्ये पण चातुर्य दाखवावं लागेल.”
यावेळी संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आस्ट्रेलियाचा संघ हा अनुभवी संघ असुन त्यांच्याकडून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आम्ही क्षेत्ररक्षण आणि इतर गोष्टींवर काम करुन पुन्हा ताकदीने मैदानात उतरु असेही ती म्हणाली.
महत्वाच्या बातम्या
तिसऱ्या टी20 सामन्यात अर्धशतकावीर ठरली कर्णधार Alyssa Healy, परभवासह भारातने मालिकाही गमावली
Mumbai Cricketer Dies: मुंबईच्या दिग्गज क्रिकेटरचा बॉल लागून मृत्यू, मैदानावरच घेतला अखेरचा श्वास