अहमदाबाद। शनिवारी (६ मार्च) भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह ४ सामन्यांची कसोटी मालिकेही भारताने ३-१ अशा फरकाने जिंकली. या विजयानंतर भारताने अनेकांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, आनंद महिंद्रा यांचे अक्षर पटेलच्या सनग्लासेसबद्दल (चष्मा) विचारणा केलेले ट्विट व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात झालेला चौथा कसोटी सामना जिंकून भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही धडक मारली आहे. आता अंतिम सामन्यात त्यांना लॉर्ड्सवर १८ ते २२ जून दरम्यान न्यूझीलंडचा सामना करायचा आहे.
भारताच्या या विशेष विजयात अक्षर पटेलचा मोठा वाटा राहिला. त्याने या कसोटी मालिकेत मिळून ३ सामन्यात १०.५९ च्या सरासरीने २७ विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने ४ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला.
याबद्दल कौतुक करताना महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अक्षर पटेलचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्याने सनग्लासेस घातले आहे. तसेच या फोटोसह महिंद्रा यांनी ट्विट केले की ‘झालं सर्व! मालिका खिशात घातली. भारताच्या विजयाच्या स्मरणार्थ मला आहे हे सनग्लासेस घेण्याची गरज आहे. ते कोणत्या ब्रँडचे आहेत आणि मला ते कुठे मिळतील?’
Ok. Done & dusted. Series win in the pocket. 👏👏👏Now I need to get these sunglasses to commemorate the victory. Which brand are they and where can I get them? pic.twitter.com/zp4bbyzPl8
— anand mahindra (@anandmahindra) March 6, 2021
आंनद महिंद्रांचा चाहत्यांच्या उत्फुर्त प्रतिक्रिया
आनंद महिंद्रा यांचे सनग्लासेसबद्दलचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. तसेच या ट्विटवर त्यांना खूप प्रतिक्रिया देखील आल्या. त्यातील अनेक ट्विटर वापरकर्त्यांच्या मते अक्षरच्या सनग्लासेसचा ब्रँड ‘ओकले मेन्स रडार शील्ड’ हा आहे. तसेच काही ट्विटर वापरकर्त्यांनी तर या सनग्लासेसची ऍमॅझॉनवरील लिंकही शेअर केली आहे. मात्र, अजून तरी अक्षर पटेलने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Dear Sir. These are Oakley sunglasses. This particular model is the Radar EV. I work with Oakley and will be glad to send across a pair or two to you if you could provide me with a contact address. This is Ashwin Krishnan here and I Head Sports Marketing for Oakley in India.
— Ashwin Krishnan (@AshtagSport) March 6, 2021
Sir, it is an oakley. You can get some fine ones from lodhi sports, delhi.
— Anuj Pal (@AnujPal57902052) March 6, 2021
Sir, here you go
Oakley Men's Radar Shield Sunglasses https://t.co/NOTEPKfSg4
— Omar Irfan (@anshumansingh03) March 6, 2021
That's an Oakley.
Please get one for me too sir . 😉😁— Ashish Sen (@ashishsenn) March 6, 2021
Oakley,,, please don't forget to post your pictures wearing these,,,
— Aditya Singh Chaudhary 🇮🇳 (@AdityaS62443058) March 6, 2021
@oakley you need to look at fan club 😀@anandmahindra I am sure @oakley will come to deliver it to you.
— Rana Singh (@_singhrana) March 6, 2021
ऑस्ट्रेलिया विजयातील पदार्पणवीरांना महिंद्रांकडून मिळाली होती भेट
काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत करण्याचा कारनामा केला होता. या विजयात अनेक युवा खेळाडूंनी मोलाची कामगिरी बजावली होती. हे लक्षात घेऊन आनंद महिंद्रा यांनी युवा भारतीय खेळाडूंना बक्षीस म्हणून महिंद्रा कार भेट देण्याचे जाहीर केले होते. त्यांनी मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, शुबमन गिल आणि नवदीप सैनी या युवा भारतीय क्रिकेटपटूंना कार भेट देण्याचे जाहीर केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या विजयाने साधला गेला योगायोगांचा ‘चौफेर मेळ’, पाहा काय ते
अक्षरने छाप सोडली! पहिल्याच कसोटी मालिकेत मोठे विक्रम करत मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
विराट अँड कंपनीची भरारी! इंग्लंडवरील विजयाने जागतिक क्रमवारीत गाठले अव्वल स्थान