भारतातील मोठे व्यावसायिक असलेल्या आनंद महिंद्रा यांनी आपले वचन पूर्ण करत टी नटराजनला ‘थार एसयूव्ही’ कार भेट दिली आहे. त्यानंतर नटराजननेही महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना एक खास रिटर्न गिफ्ट दिले आहे.
महिंद्रांनी दिले होते वचन
काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने पराभूत करण्याचा कारनामा केला होता. या विजयात अनेक युवा खेळाडूंनी मोलाची कामगिरी बजावली होती. हे लक्षात घेऊन आनंद महिंद्रा यांनी युवा भारतीय खेळाडूंना बक्षीस म्हणून ‘महिंद्रा थार’ भेट देण्याचे जाहीर केले होते. त्यांनी मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, शुबमन गिल आणि नवदीप सैनी या युवा भारतीय क्रिकेटपटूंना कार भेट देण्याचे जाहीर केले होते.
त्यांनी घोषणा केल्यानुसार नटराजनला त्याची थार मिळाली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर माहिती शेअर करत महिंद्रांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर नटराजनने रिटर्न गिफ्ट म्हणून गॅबा येथे झालेल्या कसोटी सामन्यात घातलेली जर्सी स्वाक्षरी करुन महिंद्रा यांच्यासाठी दिली आहे.
नटराजनने मानले आभार
नटराजनने त्याच्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की ‘भारतासाठी क्रिकेट खेळणे, हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. या मार्गावर पुढे जाणे माझ्यासाठी खूप वेगळे होते. मला जे प्रेम आणि आपुलकी मिळाली, त्याने मी भारावून गेलो आहे. चांगल्या लोकांकडून मिळालेल्या पाठिंबा आणि प्रेरणेमुळे मला पुढे जाण्यासाठी मदत मिळाली आहे.’
Playing cricket for India is the biggest privilege of my life. My #Rise has been on an unusual path. Along the way, the love and affection, I have received has overwhelmed me. The support and encouragement from wonderful people, helps me find ways to #ExploreTheImpossible ..1/2 pic.twitter.com/FvuPKljjtu
— Natarajan (@Natarajan_91) April 1, 2021
नटराजनने पुढे दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले की ‘आज मी ही सुंदर महिंद्रा थार चालवून घरी परतलो आहे. मी श्री आनंद महिंद्रा यांचे आभार मानतो की त्यांनी माझा प्रवास ओळखला आणि माझे कौतुक केले. क्रिकेटबद्दल तुम्हाला असलेले प्रेम मोठे आहे. मी तुमच्यासाठी गॅबा कसोटीतील जर्सी स्वाक्षरी करुन पाठवत आहे.’
As I drive the beautiful @Mahindra_Thar home today, I feel immense gratitude towards Shri @anandmahindra for recognising my journey & for his appreciation. I trust sir, that given your love for cricket, you will find this signed shirt of mine from the #Gabba Test, meaningful 2/2
— Natarajan (@Natarajan_91) April 1, 2021
गॅबा, ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटचा कसोटी सामना झाला होता. त्यावेळी ३२ वर्षात या स्टेडियमवर अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाची धूळ चारत भारताने इतिहास रचला होता. या स्टेडियमवर मिळवलेल्या विजयामुळे भारताने कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली होती.
नटराजन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन्ही क्रिकेट प्रकारामध्ये पदार्पण करणारा पहिला भारतीय –
नटराजनने २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण केले आहे. तो एकाच दौऱ्यात तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. खरंतर त्याची या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी नेट गोलंदाज म्हणून निवड झाली होती. मात्र, भारतीय संघाचे खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याने त्याला तीन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पणाची संधी मिळाली. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने १ वनडे, ३ टी२० आणि १ कसोटी सामना खेळताना एकूण ११ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
“आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकून कोणावर उपकार केले नाहीत”, गौतम गंभीरचे खळबळजनक भाष्य
आयपीएल २०२१ पूर्वी ‘या’ दोन संघांना आपला कर्णधार बदलण्याची आहे गरज
IPL 2021: ‘या’ कारणांमुळे मुंबई इंडियन्स सलग तिसऱ्यांदा आयपीएल विजेता होण्यात ठरु शकतो अपयशी